खबरदार! विदेशी फटाक्यांची विक्री केल्यास कठोर कारवाई; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Nanded: विदेशी फटाके विक्री करतांना आढळून येणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे.
Nanded News: अवघ्या पाच-दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) येऊन ठेपली असून, सर्वत्र या सणाची तयारी केली जात आहे. तर दिवाळीच्या जल्लोषासाठी फटाक्यांची बाजार (Fireworks Market) सजली आहे. मात्र याचवेळी विदेशी फटाके विक्री (Selling Exotic Fireworks) करणं फटाके विक्रेत्यांना महाग पडणार आहे. कारण नांदेड जिल्ह्यात विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांनी सतर्क राहुन योग्य ती तपासणी करण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. तर विदेशी फटाके विक्री करतांना आढळून येणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधीता विरूध्द त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल. सर्व फटाका आस्थापनांनी सर्व समावेशक तपासणी करून सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्यामार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची, तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहे. अनधिकृत फटाक्यांचे दु्ष्परिणाम या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड उपविभागीय दंडाधिकारी सर्व, कार्यकारी दंडाधिकारी सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पत्रकार परिषदा आयोजित करून सर्वाना मार्गदर्शन करावे. सदर कार्यात लोकसहभाग वाढविण्याकरिता जनजागृती करावी आशा सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन...
सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांनी किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करताना, विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक विक्रीस प्रतिबंध करण्याकरिता सर्वेच्च न्यायलयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना सर्व परवानाधारक यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांच्या साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैद्य आणि दंडनिय अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
भरारी पथकाची नियुक्ती करा...
आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड उपविभागीय दंडाधिकारी सर्व कार्यकारी दंडाधिकारी सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील भरारी पथकाची नियुक्ती करावी. या पथकाने विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री, व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी. तसचे दिपावली कालावधीत फटाके वाजविण्याची वेळ सकाळी 6 ते 8 दोन तास रात्री 8 ते 10 दोन तास असेल याबाबतची काटेकोरपणे तपासणी पोलिस विभागाने व संबंधित महानगरपालिका व व नगरपालिका/ नगरपंचायत यांनी करावी असे आदेश देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.