एक्स्प्लोर

नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर भक्तांसाठी लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा उपलब्ध होणार

Nanded : भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार (20 मे) रोजी संपन्न होणार आहे.

Nanded News : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) माहूर गडावर लवकरच लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 18 महिन्यात भक्तांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तर वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवार (20 मे) रोजी संपन्न होणार आहे. माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगणात सकाळी 10 हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर हे उपस्थित राहतील.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लवकरच लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा उपलब्ध करुन देण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात घोषणा केली होती. त्यानुसार यासाठी 50 कोटी 60 लाख रुपयाची तांत्रिक मान्यता देण्यात आली. तर उद्या म्हणजेच शनिवारी या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. 

अशी आहेत प्रकल्पाची ठळक वैशिष्टे

  • स्काय वॉकची लांबी 70 मीटर तर रुंदी 15 मीटर असेल.
  • लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 25 मीटर असून एकूण 4 लिफ्टची 20 प्रवासी क्षमता असेल.
  • अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 23 मीटर असून एकूण 4 लिफ्टची 20 प्रवासी क्षमता असेल.
  • या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस 80 प्रवासी चढणे आणि उतरण्याची असेल.
  • या प्रकल्पामध्ये एकुण 32 दुकान गाळे, प्रसाधन गृह, सुरक्षा कर्मचारी कक्ष, उपाहार गृह उपलब्ध असतील.
  • मंदिर प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय राहिल. 
  • दर्शनीय लॉबी, भविष्यातील गरजेनुसार ट्रॅव्हेलेटरचे प्रयोजनासह राहील.
  • सोलार सिस्टीम प्लांट, भूमिगत पाणी टाकीची क्षमता 2 लाख लिटरची असेल.
  • याचबरोबर घनकचरा निर्मूलन व्यवस्था, प्रतीक्षालये, वृद्ध आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र दर्शन रांग, सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था, हिरकणी कक्ष व दोन स्वतंत्र कक्ष राहतील.

श्री रेणुका देवी मंदिर माहूरगडसाठी लिफ्टसह स्काय वॉकचे बांधकाम करण्यास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकुण 51.03 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्थापत्य व विद्युतसाठी 50.60 कोटी रुपयास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाचा कालावधी हा 18 महिने असून प्रकल्प हाताळणे व देखभाल, दुरुस्तीसाठी 10 वर्षाचा कालावधी राहिल. कामाची अंदाजित किंमत ही 39 कोटी 91 लाख रुपये वस्तू व सेवाकर वगळून आहे. प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मे. व्यापकॉस ली. गुरुग्राम आहे. मे. डी. सी. गुरुबक्षानी नागपूर यांना हे काम देण्यात आले आहे.

कार्यक्रमात यांची उपस्थिती असणार...

या समारंभास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आ. भिमराव केराम, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

बीआरएस पक्षाची नांदेडमध्ये राज्यस्तरीय बैठक, विधानसभा निवडणुकीवर होणार चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget