एक्स्प्लोर

Nanded : ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Diwali : सणासुदीच्या तोंडावर ऑनलाईन बाजाराने स्थानिक व्यावसायिकांचा हातचा रोजगार हिरावला असल्याचं दिसून येतंय. 

नांदेड : तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिवाळी सण हा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्यामुळे सामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे दोन वर्षे बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईला आले होते. यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असताना, धंदा चांगला होऊन व्यवसायास हातभार लागेल अशी स्थानिक व्यावसायिकांना अशा होती. मात्र ऐन दिवाळीत या स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांवर ऑनलाइन बाजारपेठेमुळे संक्रांत आली आहे.

दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी रेलचेल सुरू असते. ज्यात मातीचे दिवे, आकाश कंदील, कानातील बाळी, रांगोळी विक्रेते या स्थानिक व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे दसरा, दिवाळी, पाडवा या कालावधीत नागरिकांनी केलेल्या भरमसाठ खरेदीवर स्थानिक रोजगारांचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र नागरिकांचा ऑनलाइन खरेदी विषयी वाढता कल, या स्थानिक रोजगाराच्या मुळावर उठलाय. कारण दिवाळसणात खरेदीदार नागरिक कपडा, बूट, ग्रोसरी, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, कंदील,दिवे या छोट्यामोठ्या वस्तूसह इतर महागडे साहित्य हे ऑनलाइन खरेदी करत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळसणात या स्थानिक कामगारांच्या हातचा रोजगार हिरावला गेलाय. 

नागरिकांचा ऑनलाइन खरेदीचा वाढता कल लक्षात घेता, खरेदीदार नागरिक स्थानिक बाजारातील बाजारपेठेकडे पाठ करताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत स्थानिक दुकानदारावर ऑनलाइन बाजारपेठेमुळे संक्रांत आली. प्रत्येक्ष खरेदी पेक्षा, घरी बसल्या ग्राहकांकडून ऑनलाइन खरेदीला पसंती मिळतेय. ऑनलाइन खरेदी वाढल्यामुळे दिवाळीच्या सणातही छोट्यामोठया उद्योगाची खरेदी अभावी बोंबाबोंब होतेय. तर ग्राहक दिवाळीचा फराळ, कपडे, बूट, टीव्ही, मोबाईल ऑनलाइन खरेदी करत असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे छोटेखानी व्यवसाय बसण्याचा मार्गावर आहेत.

गेली दोन ते अडीच वर्षे कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन मिटिंग, ऑनलाइन कॉन्फरन्स, ऑनलाइन क्लास ह्या संकल्पना वाढल्या आहेत. त्यातच बाजारपेठेत न जाता आल्यामुळे ऑनलाइन बाजारपेठा सुरू होऊन, प्रत्यक्ष खरेदीला बगल बसली आणि ऑनलाइन बाजार सुरू झाला. ज्याचा विपरीत परिणाम आता संपूर्ण बाजारपेठा सुरू झाल्यानंतर दिसू लागला आहे.

दरम्यान मागच्या काही काळापासून नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला असून, शहरी भागासह ग्रामीण भागात ग्राहक किराणा सामान वगळता इतर सामान ऑनलाइन खरेदी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.

घरपोच सेवा, सामान आल्यावर पैसे द्यायचे, सामान खराब झाले तर कंपनी परत घेणार आणि दर्जेदार वस्तू मिळतात. म्हणून तरुणांसह अबाल वृद्धांना ही ऑनलाइन खरेदीची चांगलीच भुरळ पडलीय. यामुळे बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावल्याने, पर्याय जोड व्यवसाय काय करता येईल या विचारात अनेक व्यापारी आहेत. सध्या ऑनलाइन खरेदी जोरात होत आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्याकडे खरेदी कोणी करीत नाही. जर कोणी स्थानिक व्यापाऱ्याकडे खरेदीला गेला तर ते ग्राहक उधारीवाले जास्त असतात. शहरातील या सवयी आता ग्रामीण स्तरावरही नागरिकांना लागत आहेत. ऑनलाइन खरेदीत मिळणारी ऑफर तसेच होणाऱ्या पैशाची बचत ही कारणे सांगत प्रत्येकजण ऑनलाईन खरेदीला महत्व देत आहे. या ऑनलाईन खरेदीमुळे मात्र छोटे व्यापारी चांगलेच डबघाईला आले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget