एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nanded Crime News : हातात तलवारी अन् थेट सपासप वार; नांदेडमध्ये तरुणाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

Nanded Crime News : नांदेडमधील तरुणाची हत्या करण्यात आली असून, ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यात दोन गटात हाणामारी होतांना दिसत आहे.

नांदेड : शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सराफा भागात जुन्या वादातून तलवारीचे वार करून एका युवकाचा हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सागर यादव (रा. नावघाट नांदेड) असे मयताचे नाव असून, केशव पवार (रा. शनिमंदिरजवळ) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

अधिक माहितीनुसार, सागर यादव आणि आरोपी केशव पवार यांच्यात जुना वाद होता. काही दिवसांपूर्वी हा वाद मिटलाही होता. मात्र सोमवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता सराफा भागात सागर यादव याच्यावर केशवने तलवारीने वार केला. यात सागर यादव याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस पोहोचले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं? 

इतवारा येथील जुगार अड्ड्यावर सागर यादव आणि केशव पवार यांच्यात सोमवारी दुपारच्या सुमारास भांडण झाले होते. त्यानंतर याच भांडणाच्या रागातून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या पुन्हा हाणामारी झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत केशव पवारने तलवारीने सागर यादवच्या डोक्यावर वार केले. तसेच सागरचा भाऊ भानू यादव याच्यावरही तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात सागर यादव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जखमी भानू यादववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्यासह पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले.

आतापर्यंत 18 संशयित आरोपी ताब्यात...

दरम्यान, तलवारीने वार करून युवकाची हत्या केल्याची घटना इतवारा पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. तर, पैश्यांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची फिर्याद अभिमन्यू मंडले यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 18 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली आहे. 

घटना सीसीटीव्हीत कैद... 

नांदेडमधील तरुणाची हत्या करण्यात आली असून, ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यात दोन गटात हाणामारी होतांना दिसत आहे. मात्र, याचवेळी दुचाकीवरून आलेलं एक गट गोणीतून तलवारी काढतांना दिसत आहे. हातात तलवारी आणि चाकू घेऊन थेट सपासप वार करण्यात येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Pune Crime News : फुटपाथवर झोपण्यावरुन दोघांमध्ये वाद; डोक्यावर, हातावर वार करून 75 वर्षीय फिरस्त्याची हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Embed widget