Vidarbha Weather Update: विदर्भात उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा गेला चाळीशी पार; पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा
विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांत उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर पुढील 3 विदर्भातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Vidarbha Weather Update: राज्यासह देशभरातील हवामानात मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला असताना आगामी काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाच्या (IMD) वतीने देण्यात आला आहे. आजघडीला विदर्भातील (Vidarbha ) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या (Heat) पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर, आज विदर्भात सर्वाधिक तापमान 42. 4 अंश सेल्सिअस हे चंद्रपुर (Chandrapur) जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. तर त्याखालोखाल यवतमाळ येथे 42. 0 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली. तर पुढील 3 दिवस विदर्भातील बहुतांश भागात 40 ते 50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि अवकळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
आगामी दिवसात विदर्भात पुन्हा अवकाळीचे ढग
विदर्भात एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासात राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये विदर्भात उद्या 7 एप्रिल रोजी विदर्भातील चंद्रपुर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास सोसाट्याच्या वादळीवाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर नागपूर, यवतमाळ, गोंदिया,अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास सोसाट्याच्या वादळीवारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर 8 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 9 एप्रिल रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित गडचिरोली, चंद्रपुर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम येथे 40 ते 50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ते विरळ पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
भंडाऱ्यात विक्रमी तापमानाची नोंद
हवामान विभागानं भंडारासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस प्रखर उष्णता राहील असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, भंडाऱ्यात या वर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल भंडाऱ्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच आज देखील जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे बघायला मिळत आहे. सकाळपासून प्रखर उष्णता असल्यानं चेहऱ्यावर रुमाल किंवा स्कार्फ बांधून नागरिक घराबाहेर पडताना बघायला मिळत आहे. तर, काहीनी दुपारी घरातून बाहेर पाडण्याचे टाळले आहे. परिणामी, दुपारी शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहतूक होताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या