ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय,काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा https://tinyurl.com/3jn99hzp नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, स्थानिक नेत्यांना युतीच्या निर्णयाचा अधिकार नाही, सचिन सावंत यांचं वक्तव्य, मनसेशी युतीवरुन गोंधळात गोंधळ https://tinyurl.com/huhs7vx8 काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची, नाना पटोलेंचा आरोप https://tinyurl.com/yvfx9am3
2. मनसेचा मुंबईतील 227 जागांचा आढावा, 125 जागांवर ताकद असल्याचा अंदाज,मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी https://tinyurl.com/bdhwevak 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल! https://tinyurl.com/m4vn45np
3. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात,उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव अन् खजिनदार पदासाठी मतदान होणार https://tinyurl.com/mp9rdk4n देवेंद्र फडणवीस, शरद पवार आशिष शेलार यांना वाटलं मी योग्य खेळाडू , त्यामुळे माझी निवड झाली, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3btr8fav
4. रुपाली पाटील ठोंबरे अन् अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी सुनील तटकरेंकडून जाहीर https://tinyurl.com/yscdhnvm माझ्याह मिटकरी, वैशाली नागवडेंची नावं नाहीत, पक्षाचं काम जोमानं करणार, अजित पवारांना भेटून विषय समजून घेणार, रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ymk25wmz दुनिया दौडनेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है, शायरी पोस्ट करत अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ab4k83xw
5. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, प्रवासात मोबाईल बंद ठेवा; पोलीस अधिकाऱ्यांकडून सावध राहण्याचे निर्देश मिळाल्याची दमानियांची माहिती https://tinyurl.com/mv48v3tc
6. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनोमिलन, नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावर लढणार, नगराध्यक्षपदाचा निर्णय मुंबईत होणार असल्याची शिवेंद्रराजेंची माहिती https://tinyurl.com/ymfryr59 चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, हसन मुश्रीफ यांचा पुढाकार, राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन https://tinyurl.com/ypwud56p
7. सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का, भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार https://tinyurl.com/4mf62z5j कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची होणार एंट्री; रत्नागिरी नगरपरिषदेसाठी प्रहार मैदानात https://tinyurl.com/nhe6acmu
8. अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर ठेवल्यानं चाहत्यांची काळजी वाढली, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू https://tinyurl.com/y7c72hrp
9. पुणे पोलीस फरार गुंड निलेश घायवळ विरोधात आक्रमक, आर्थिक व्यवहार तपासणीसाठी ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच येण्याची शक्यता https://tinyurl.com/4hnwsftk
10. ऑस्ट्रेलिया दौरा संपला! आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, कसोटी, वनडे अन् टी 20 सह एकूण 10 सामने खेळणार, कोलकाता येथे 14 नोव्हेंबरपासून पहिली कसोटी https://tinyurl.com/ewxcfemj
*एबीपी माझा स्पेशल*
ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांची सोशल मीडिया अकाऊंट बंद होणार, 10 डिसेंबरपासून अंमलबजावणी, पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची घोषणा https://tinyurl.com/yrmkwzu5
महापालिकेचा महासंग्राम, चंद्रपुरात समस्या काय? https://www.youtube.com/watch?v=DvJsIuWi3xs
महापालिकेचा महासंग्राम, नाशिक महापालिकेची स्थिती काय? https://www.youtube.com/watch?v=nAlGJE-6XHQ
महापालिकेचा महासंग्राम, भिवंडी महापालिकेची स्थिती काय? https://www.youtube.com/watch?v=rKhVYYE8giQ
महापालिकेचा महासंग्रास, परभणीत नागरिकांच्या समस्या काय? https://www.youtube.com/watch?v=T1VcC4_M0jo
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























