एक्स्प्लोर

चुकीच्या मीटर रिडिंगमुळे वीजबिलांमध्ये तफावत, रिडिंग घेणाऱ्या 76 एजन्सी बडतर्फ, महावितरणचा झटका

Meter Reading : मीटर रिडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सी तसंच जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध महावितरणने कारवाईचा बडगा उगारला. राज्यातील 76 मीटर रिडिंग एजन्सीना बडतर्फ केलं आहे. तर महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

Meter Reading : मीटर रिडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सी तसंच जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध महावितरणने (Mahavitaran) कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणने राज्यातील तब्बल 76 मीटर रिडिंग एजन्सीना बडतर्फ केलं आहे. तर महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे (Electricity Bill) ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप आणि वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेत, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत प्रयत्न केले होते. त्यानंतर आता महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यात वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

76 मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ, महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रिडिंग अचूकच झालं पाहिजं. मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरु केल्या आहेत. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणं, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणं, सरासरी किंवा चुकीचं रिडिंग घेणं याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रिडिंग एजन्सीविरुद्ध तसंच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरु केला. यात राज्यातील तब्बल 76 मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आलं. तसंच महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मीटर रिडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीच्या कामांचे मूल्यांकन करत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोचे प्रमाण 45 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आलं आहे.  

महावितरणकडून सुधारणा सुरु
महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणं ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष आणि चुकीच्या रिडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलींगसाठी 100 टक्के अचूक रिडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे बिलिंग आणि रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झालं आहे. मीटर रीडिंग हे अचूक आणि गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. तसंच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीविरुद्ध बडतर्फी आणि काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज देखील या एजन्सींना देण्यात आली आहे.

अचूक मीटर रिडिंगमुळे महावितरणच्या महसुलासोबतच वीज वितरण हानीत देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट वीज ग्राहकांना होणार असून वीजहानीपोटी त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड देखील कमी होणार आहे. याशिवाय वीज बिलासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

हेही वाचा : Smart Electricity Meter : 'स्मार्ट मीटर' हिताचे की तोट्याचे? वीज ग्राहकांमध्ये संभ्रम

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget