एक्स्प्लोर

तुकाराम मुंढे लोकशाहीविरोधी, नगरसेवकांच्या हक्क आणि कर्तव्यांची गळचेपी करणारे; भाजप आक्रमक

नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरुन सुरु झालेल्या वादावरुन भाजपने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुकाराम मुंढे लोकशाहीविरोधी असून ते नगरसेवकांच्या हक्क आणि कर्तव्यांची गळचेपी करणारे आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.

नागपूर : नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास काल (19 जून) राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला. म्हणजेच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कोरोना काळात महापालिकेची सर्वसाधारण सभा होऊ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने एकाप्रकारे फेटाळून लावला आहे. त्यानंतर भाजपने मुंढे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत ते लोकशाही विरोधी असून ते नगरसेवकांच्या हक्क आणि कर्तव्यांची गळचेपी करणारे असल्याची टीका केली आहे.

लोकशाहीमध्ये एखादा अधिकारी सभागृहाच्या बैठकीपासून पळ तेव्हाच काढतो, जेव्हा त्याने काही चूक केलेली असते किंवा त्याचे निर्णय जनविरोधी असतात. तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही महिन्यात नागपुरात अनेक नियमबाह्य कामं केली असून विकासकामांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे आजच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवक त्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करतील, असे मत भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. तसंच मुंढे यांची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच सर्वसाधारण सभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा भाजपचा अजेंडा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहाची बैठक महापौरांनी बोलावली आहे आणि त्याबद्दलच सभेत चर्चा व्हावी अशी अपेक्षा असल्याचे तिवारी म्हणाले. राज्य सरकारने महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी देऊन लोकशाहीचे रक्षण केल्याची भावनाही भाजप नगरसेवकांनी बोलून दाखवली.

काय आहे सर्वसाधारण सभेबद्दलचा वाद? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली नाही. दर महिन्याला एकदा सर्वसाधारण सभा होणं अपेक्षित असताना महापौर संदीप जोशी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत चर्चा करुन 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावली होती. परंतु महापालिकेची सभा ज्या ठिकाणी होणार तो टाऊन हॉल कोरोनाचं प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा मुद्दा पुढे करत तिथे सभा घेता येणार नाही अशी भूमिका आयुक्त मुंढे यांनी मांडली. त्यानंतर सर्वपक्षीय गट नेत्यांनी महापालिकेच्या मालकीच्या आणि तब्ब्ल दोन हजार आसन क्षमता असलेल्या विशालकाय भट सभागृहात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना संदर्भातले सर्व नियम पळून सभा घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अशी सभा घ्यावी की नाही याबद्दल राज्य शासनाचा अभिप्राय मागितला होता. त्यावर राज्य शासनाने अशी सभा घेण्यास हरकत नाही. सर्व महापलिकानी अशी सभा केव्हा आणि कोणत्या स्थितीत घ्यावी हे त्यांच्या पातळीवर ठरवावे असे सांगत फक्त सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत सभा घेण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेला राज्य शासनाने एकाप्रकारे नाकारल्याचं सांगत भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget