Court News : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, नराधम बापास 20 वर्षाचा सश्रम कारावास
मुलीने सावत्र आईला याबाबत सांगितले असता ही बाब कुणालाही सांगू नकोस, समाजात आपली बदनामी होईल, असे सांगून तक्रार करण्यापासून रोखले. मुलीने आजीला ही घटना सांगितली आणि आजीने मुलीच्या सख्या आईला कळवले.
Nagpur : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधम बापास जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्ष सश्रम कारावास व सावत्र आईस पाच हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यत कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन पिडीतेच्या आईची वडिलांसोबत फारकत झाली होती. त्यानंतर वडिलांनी दुसरीशी संसार थाटला. अल्पवयीन मुलगी ही वडिलांकडे राहत होती. यातील आरोपी हा मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करायचा.
Uddhav Thackeray Interview : हल्लाबोल, आसूड, गौप्यस्फोट; शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाकरेंची पहिली मुलाखत, एबीपी माझावर प्रक्षेपण
सावत्र आईनेही प्रकरण दाबण्यास केली मदत
याबाबत मुलीने सावत्र आईला सांगितले असता ही बाब कुणालाही सांगू नकोस, समाजात आपली बदनामी होईल, असे सांगून तिला तक्रार करण्यापासून रोखले. त्यानंतर वडिलांचा त्रास वाढत असल्याने मुलीने आपली आपबिती ही आजीला सांगितली. आजीने ही बाब मुलीच्या सख्या आईला सांगितली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 2020 साली उमरेड पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात 376(अ),(ब)(2),(एन),(एफ), 377, 506 भादंवि 4, 6, 21 (1) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Politics : 'धनुष्य बाण' कोणाचा? शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी
आजीने केली मदत, अन् नराधम बापाला झाली अटक
तपासाअंती आरोपी वडिल व सावत्र आई या दोघांविरोधात जिल्हा सत्र न्यायालय पोस्कोमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षांची बाजू, पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने आरोपी वडिल व सावत्र आईस दोषी ठरवित वडिलांना वीस वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच सावत्र आईस 5000 रुपये दंड व कोर्ट उठेपर्यत कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी केले. शासकीय अभियोक्ता म्हणून खापर्डे यांनी काम बघितले.