एक्स्प्लोर
क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनावेळी गोंधळ, धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला
सुरुवातीला प्रचंड गर्दी झाल्याने महेंद्रसिंग धोनीचे स्टेजपर्यंत आगमन मुख्य मार्गावरुन शक्य झाले नाही. त्यामुळे धोनीला मागच्या बाजूने गवताच्या आणि काटेरी झुडूपांमधून उद्घाटनस्थळी आणावं लागलं.
नागपूर : नागपुरात क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनावेळी गोंधळ झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून परत गेला. एसजीआय या संस्थेमार्फत नागपूरच्या गायकवाड पाटील आंतरराष्ट्रीय शाळेच्या आवारात महेंद्रसिंह धोनी रेसिडेंशियल क्रिकेट अकादमी सुरु करण्यात आली आहे. या अकादमीचं उद्घाटन महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते झालं. परंतु ढिसाळ नियोजन आणि उद्घाटन कार्यक्रमातील गोंधळामुळे नाराज झालेल्या महेंद्रसिंह धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला आणि हॉटेलवर परतला.
अकादमीचं उद्घाटन झाल्यानंतर स्टेजजवळ मीडियाचे कॅमेरे आणि हौशी प्रेक्षक मोबाईलमध्ये धोनीची झलक कैद करणारे जमा झाले. परिणामी इथे तुफान गर्दी झाली. त्यातच धोनीच्या सुरक्षेसाठी असलेल्या खाजगी सुरक्षा एजन्सीच्या बाऊन्सर्सनी लोकांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे धोनी काहीसा नाराज झाला होता.
सुरुवातीला प्रचंड गर्दी झाल्याने महेंद्रसिंग धोनीचे स्टेजपर्यंत आगमन मुख्य मार्गावरुन शक्य झाले नाही. त्यामुळे धोनीला मागच्या बाजूने गवताच्या आणि काटेरी झुडूपांमधून उद्घाटनस्थळी आणावं लागलं. त्याच्या छोटेखानी भाषणात धोनीने उपस्थित पालकांना कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या लहान मुलांना सांभाळा, असंही म्हटलं.
स्टेजवरील कार्यक्रम संपल्यानंतर धोनी रेसिडेंशियल अकादमीच्या खेळाडूंसोबत मैदानावर जाणार होता. मात्र नाराज धोनीने तिकडे न जाताच आणि थेट हॉटेल गाठलं. मात्र, आयोजनकांनी उपस्थित लोकांना धोनी निघून गेल्याचे सांगितलंच नाही. साडेबारा वाजेपर्यंत लोक मैदानाजवळ धोनी येईल म्हणून वाट पाहत बसले होते, मात्र तो आलाच नाही. अखेर पोलिसांनी पाऊणच्या सुमारास धोनीने शाळेचा परिसर सोडल्याचं उपस्थितांना सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement