एक्स्प्लोर

Swabhimani Shetkari Sanghatna महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार?

कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर : माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्वाभिमानीची वाटचाल भाजपशी युती होण्याच्या दिशेने होऊ शकते.

राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहेत. वीज मिळावी या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध केला होता. शिवाय कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? अशी जहरी टीकाही केली होती. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वरुड-मोर्शी मतदारसंघाचे 'स्वाभिमानी'चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाही. 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे वरुड-मोर्शीतील हिवरखेड इथे सभा घेणार आहेत. सभेच्या पोस्टरवर देवेंद्र भुयार यांचे नाव नाही आणि त्यांना सभेचे निमंत्रण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर आमदार भुयारांच्या मतदारसंघात काय तोफ डागतात याकडे लक्ष लागलं आहे. 

सत्तेतून बाहेर पडण्याची ही असू शकतात कारणे!
•  दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी 14 दिवस कोल्हापूरला धरणे आंदोलनाला बसले पण सरकारने विशेष दखल घेतली नाही, हे राजू शेट्टींच्या जिव्हारी लागले.
• केंद्र सरकारने भूसंपादनाला पाच पट मोबदल्याचा कायदा दोन पटीवर आणला आहे. 
• कर्जमाफी, पीकविमा, दिवसा वीज या मुद्द्यावर बाहेर पडू शकतात. ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे राज्य सरकारने तुकडे केले. 
• शरद पवार यांच्यासोबत जाण्याने राजू शेट्टींचा पराभव झाला, जनमत विरोधात गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. 
• स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांसोबत हातमिळवणी केलेली लोकांना आवडली नाही. 
• केंद्र सरकारविरोधी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात राजू शेट्टीचा सक्रीय सहभाग नव्हता. मग भाजपाशी आतून संपर्कात होते का? असाही सवाल विचारला जातोय 
• भाजपालाही स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत हवी आहे. 
• 'स्वाभिमानी'च्या नेत्यांची आणि भाजपची गोपनीय बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
• राजू शेट्टी यांच्याकडून वारंवार महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. 
• भविष्यात 'स्वाभिमानी' भाजप सोबत गेल्यास राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविंकात तुपकर एकाच व्यासपीठावर दिसल्यास नवल वाटू नये.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget