एक्स्प्लोर

येडीयुरप्पांच्या डायरीचा आधार घेत केलेले आरोप म्हणजे बालिशपणा, नितीन गडकरींंचं उत्तर

संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावर बोलताना गडकरी यांनी हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

नागपूर : काँग्रेसने येडीयुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत जे आरोप केले आहे ते काँग्रेसचा बालिशपणा आहे. आयकर विभागाने त्याची चौकशी केली आहे, खालची स्वाक्षरी खोटी करून ते कागद तयार केले आहे. या राजकारणातील ‘डर्टी ट्रिक्स’ आहेत. हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकात बीएस येदियुरप्पा सत्तेवर असताना कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. यासंबधी एक डायरी सीबीआयला मिळाली असल्याचा दावाही सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला होता. डायरीमध्ये 1800 कोटींच्या व्यवहाराबद्दल लिहिलं असल्याचा सुरजेवाला यांनी दावा केला होता. 'द कॅरावान' मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले होते. या डायरीच्या प्रत्येक पानावर येदियुरप्पा यांचं हस्ताक्षर असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र डायरीची सत्यतेबाबत कोणताही दावा काँग्रेसने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावर बोलताना गडकरी यांनी हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. नागपुरातून किमान साडे चार लाखांच्या रेकॉर्ड मतांनी निवडणूक जिंकेल. असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, नागपुरात 70 हजार कोटींचे विकास काम 5 वर्षात आणले आहेत. मिहानमध्ये 50 हजार रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यापैकी 25 हजार रोजगार मिहानमध्ये निर्माण केले आहेत. मेट्रो आणि  इतर विकास प्रकल्पात 25 हजार रोजगार निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकू तर महाराष्ट्रात गेल्या वेळपेक्षा 2 ते 3 जागा जास्त मिळतील. मोदी नागपूरलाही येऊ शकतील अजून त्यांचे पूर्ण कार्यक्रम अजून ठरलेले नाही. ते जास्तीत जास्त जागांवर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, असेही त्यांनी सांगितले. प्रियंका गांधी यांनी गंगेतून प्रवास केला आहे. गंगेचे पाणी ही चाखले. हे आमचा कामाची पावती आहे. एकाप्रकारे त्यांनी आमच्या कामाला प्रमाणपत्रच दिले आहे, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
Embed widget