एक्स्प्लोर

'आयातां'मुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात : नितीन गडकरी

भाजपमध्ये आयात उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

नागपूर : इतर पक्षातून भाजपमध्ये आयात झालेल्या उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. ताकदवान असून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवारांना घेऊन निष्ठावंत दुखावतात याबाबत प्रश्न केल्यावर गडकरी म्हणाले की, जो मतदारसंघ जिंकायला अवघड आहे तिथे आम्ही हा प्रयोग केला. त्याचे पक्षांतर्गत पडसाद उमटले. मात्र निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात, असे नितीन गडकरी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे, असेही ते म्हणाले. चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही, असेही त्यांनी सांगितले. माझं खाण्यावर प्रेम आहे, मात्र एकावेळी जास्त खात नाही : नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. पट्टीचे खवय्ये म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खाण्याच्या अनेक दंतकथा आहेत. याविषयी नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली. मी खाद्य प्रेमी आहे मात्र मी एकाच वेळी खूप जास्त कधी खात नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्या 'खूप' खाण्याबाबत असलेल्या दंतकथेविषयी प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी एकावेळी खूप जास्त खात नाही, असे ते म्हणाले.  खाण्याच्या प्रेमापोटी दिल्लीतील ऑफिसच्या माळ्यावर गार्डन रेस्टारंट तयार केले असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.  कॅबिनेटमध्ये नवीन पदार्थ आल्यावर मोदीजी सांगतात, नितीनजी का सुझाव है, असा किस्साही त्यांनी सांगितला. यावेळी बजेटनंतर निवडणुकीला सामोरे कसे जाणार याविषयी विचारले असता ते म्हणाले की,  बजेटनंतर आम्हाला फायदा झाला आहे, आम्ही ताकदवान झालो आणि यामुळेच सर्व विरोध पक्ष एक झाले असे, नितीन गडकरींनी सांगितले. यावेळी पुलवामानंतर निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना ओसरत असल्याने निवडणूक ग्रामीण प्रश्नांभोवती केंद्रित झाली आहे, हे तुम्हाला अडचणीचे ठरेल काय? असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर इथे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. देशात पहिल्यांदाच 20 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत मिळाले. राज्यात 26 सिंचन प्रकल्पांची कामे 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरिता 108 प्रकल्प बळीराजा योजनेच्या अंतर्गत सुरु केले आहेत. पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते मी बांधले आहेत. पुणे, कोल्हापूर रस्ता सहापदरी, मुंबई-गोवा रस्ता चारपदरी करण्याचे काम सुरु आहे. अशी अनेक कामे ग्रामीण भागासाठी सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी फॉर्म भरताना 50 हजार लोकं उपस्थित होती. त्यात माझ्या जातीचे 500 लोकही नसतील, आम्ही जात पाहत नाहीत, असे सांगत विकासाला नजरेआड करता येत नाही असे, गडकरी म्हणाले. नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारांना धक्का बसला असल्याचेही या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरींच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे - भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही - पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक -  धोक्याची घंटा नाही, अपवाद वगळता आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या - जोशी, अडवाणीजी यांच्याविषयी सन्मान कायमच, प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते - मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील - मी अर्थमंत्री नाही, होण्याची शक्यताही नाही. - जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे - चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget