एक्स्प्लोर

Electric Bus : 'आपली बस'च्या ताफ्यात 17 इलेक्ट्रिक बस, चार्जिंग स्टेशनवर फक्त सहाच पॉइंट

बसमध्ये वाहक राहणार नसून नागरिकांना कार्ड देण्यात येणार आहे. बसमध्ये चढताना ॲपमध्ये कार्ड टॉप इन करावे लागणार आहे. जिथपर्यंत ज्यायचे आहे, तिथपर्यंतच्या तिकिटचे पैसे यातून कमी होईल.

नागपूर: नागपूर महापालिकेच्या ताफ्यात 17 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. असे असले तरी चार्जिंग स्टेशन एकच असून तेथे फक्त सहा पॉइंट आहेत. त्यामुळे एकाच दिवशी सर्व बस कशा चार्ज करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहराला 17 इलेक्ट्रिक बस मिळाल्या. या बसचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहराला 17 बस मिळाल्या असल्या बुधवारपासून केवळ एकच बस सुरू करण्यात आली. मोरभवन ते श्रीकृष्णनगरपर्यंत या मार्गावर ही बस सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसांत पाटणसावंगी, बुटीबोरी, बहादुरा, पिपळा फाटा, कन्हानपर्यंत या बस धावणार आहेत. या बसच्या तिकिटासाठी नागरिकांना कार्डचा वापर करावा लागणार आहे. 

AAP Nagpur : विदर्भातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणार दिल्लीचा विकास मॉडेल, आपचा निर्धार

डिजीटल तिकीट यंत्रणा, वाहकाचीही गरज नाही

सध्या एकाच बससाठी ही सुविधा करण्यात आली आहे. या बसमधून प्रवासासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. बसमध्ये वाहक राहणार नाही. डिजिटल कॅशने व्यवहार होणार आहे. नागरिकांना कार्ड देण्यात येणार असून ते रिचार्ज करावे लागणार आहे. बसमध्ये चढताना ॲपमध्ये कार्ड टॉप इन करावे लागणार आहे. जिथपर्यंत ज्यायचे आहे, तिथपर्यंतच्या तिकिटचे पैसे यातून कमी होईल. सर्वच बसमध्ये हे ॲप राहील. नागरिकांना कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्या प्रक्रियेला नागपूरकर कसा प्रतिसाद देतात, यावरच इलेक्ट्रिक बसचे भवितव्य ठरणार आहे. याशिवाय सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी एकच वर्धमाननगर येथील एकच केंद्र आहे. येथे सहा चार्जिंग पॉईंट आहेत. एकदा बस चार्जिंग केल्यानंतर दोनशे किमीपर्यंत धावते. 

Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'

एका बसच्या चार्जिंगसाठी दोन तास

एका बसला चार्जिंगसाठी दोन तासांचा अवधी लागतो. 17 बससाठी चार्जिंग स्टेशन पुरेसे असले तरी ते एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वर्धमाननगरवरून चार्जिंग होऊन शहराच्या इतर भागात जाण्यासाठी या बसला मोरभवन येथे यावे लागणार आहे. यातच अधिक वेळ जाणार आहे. पंतप्रधान योजनेतून 145 बस आणखी मिळणार आहे. वाडी येथे तसेच वाठोडा येथे 18 एकरात चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे.

Devendra Fadnavis : नागपूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यसरकार कटीबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Embed widget