RTMNU : नागपूर विद्यापीठाची प्रवेश पूर्व परीक्षा 11 ऑगस्टला
विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टला 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 9 तारखेला परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरील लॉगीनमध्ये जाऊन डाऊनलोड करता येईल. प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक केले आहे.
नागपूर: राष्ट्रसंत तुडकोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 8 पद्व्युत्तर विभागात प्रवेशासाठी विद्यापीठाने यावर्षी प्रवेश पूर्व परीक्षा 11 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात झाली. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले. विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 9 तारखेला विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरील लॉगीनमध्ये जाऊन डाऊनलोड करता येणार आहे. विद्यापीठाने प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक केले आहे. तथापि, पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आधीच 20 रुपये शुल्क विद्यापीठाने आकारले आहे. तर आता प्रवेश परीक्षा देणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 350 तर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाच्या विभागात एम.एसस्सीच्या सुमारे 530 जागा आहेत. तर इतर विद्याशाखांमधूनही एवढ्याचा जागा आहेत.
विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया
मागील वर्षी पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबिवली होती. यावर्षी ती रद्द करून महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्यात येत आहेत. महाविद्यालये त्यांच्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊ शकतील असे नमूद आहे. परंतु केवळ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी तब्बल एक महिन्याचा कालावधी देण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे सोमवारीच अधिसूचना जाहीर करून विद्यापीठाने माहिती दिल्याने प्रवेश परिक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया गेल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
Lok Adalat : जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित, 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालत
प्रवेश परीक्षा प्रक्रीया
नोंदणी - 1 ते 7 ऑगस्ट
प्रवेशपत्र - 9 ऑगस्ट स.10 पासून
प्रवेश परीक्षा - 11 ऑगस्ट
निकाल (संभावित) - 17 ऑगस्टपर्यंत
प्रवेश व समुपदेशन - 22 ते 25 ऑगस्ट
वर्ग (संभावित) - 29 ऑगस्टपासून
अभ्यासक्रम : एम.एसस्सी., एम.एसस्सी. (होम सायन्स), एम.कॉम., एल.एल.एम., एम.ए., एम.एफ.ए., एम.लिब., एम.एस.डब्ल्यू
Agriculture : शेतीमध्ये बंपर उत्पन्न घ्या, 50 हजार रुपये जिंका; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI