एक्स्प्लोर

Lok Adalat : जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित, 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालत

अनेकवर्षांपासून न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत नागपूर जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित व वादग्रस्त प्रकरणे तडजोडीस ठेवली जाणार आहेत.

नागपूर:  जिल्ह्यात सध्या 30 हजार प्रकरण प्रलंबित असून तडजोडीद्वारे निपटारा करण्यासाठी त्यांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्यावतीने 13 ऑगस्ट  रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत नागपूर जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित व वादग्रस्त प्रकरणे तडजोडीस ठेवली जाणार आहेत.

लोक अदालती मागचा मुख्य उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवी प्रकरणे किंवा महत्वाची प्रकरणे लोकन्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली व मोठ्या प्रमाणावर निवारण करणे हा आहे. तालुका न्यायालय या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीसाठी ठेवणे हा आहे. लोक अदालतीमध्ये पुर्वबोलणी आणि सामोपचाराने पक्षकारांमधील वाद खेळीमेळीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे. या दिवशी प्रकरणातील वादात आपसी समझोता घडून आणण्यासाठी त्या समस्येची आगाऊ सूचना संबंधितांना देवून विचारविनिमय व चर्चेच्या माध्यमातून वादग्रस्त समस्येची प्रभावीपणे आपसी समझोत्याद्वारे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोक अदालतीमध्ये पक्षकारांचे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर भरीव जनजागृती करण्यात आली आहे. 

या प्रकरणांमध्ये तडजोड

यामध्ये समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्ताऐवज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल, राज्य परिवहनाची प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुर्ननियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे, कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक वेतनासंबंधी व इतर प्रलंबित प्रकरणे. भूसंपादन प्रकरणे, वीजेची आणि पाणी बिलाची प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसै आणि भत्ते व सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासंबंधित प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे जसे भाडेसंबंधी, वहिवाटीसंबंधीचे दावे आणि ग्राहक तक्रारीचे संबंधित प्रकरणे यांचा समावेश आहे.

येथे साधा संपर्क

पक्षकारांनी पुढील चौकशीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सिव्हील लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा. पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून या सुर्वण संधीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.बी. अग्रवाल व प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Dattatray Bharane : आपलं पॅनेल 10 हजार मतांच्या लीडनं विजयी झालं पाहिजे, दादांच्या फोटोकडे पाहा, गमती जमती करु नका : दत्तात्रय भरणे
दादांचे आपल्यावर किती उपकार हे समोरच्या माणसाला कळायला पाहिजे होतं, दत्तात्रय भरणेंचा पुरुषोत्तम जगतापांना टोला
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget