RTMNU Extortion case : विद्यापीठातील खंडणी प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल ; आज नीलम गोऱ्हे व उच्चशिक्षण मंत्री पाटील यांची बैठक
गंभीर तक्रार असताना संबंधिताला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येते. मात्र, धवनकर हे कार्यरत आहेत. कुलगुरु डॉ. चौधरी यांच्याकडून धवनकरांचा बचाव करण्यात येत आहे का, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (RTMNU) गाजत असलेल्या खंडणी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या समितीला अखेर अध्यक्षपद मिळाले आहे. समितीच्या स्थापनेच्यावेळी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी या चौकशी समितीतून माघार घेतल्याने अॅड सुमित जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून आज, बुधवारी (30 नोव्हेंबर) खंडणी प्रकरण आणि हिंदी विभागातील पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणावर उपसभापती नीलम गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक होणार आहे.
लैंगिक छळाची तक्रार (Complaint of sexual harassment) झाल्याची भीती दाखवत प्राध्यापकांकडून 17 लाखांची खंडणी वसूल करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांचे प्रकरण सरकारदरबारी गंभीरतेने घेण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठात सात प्राध्यापकांनी जनसंपर्क विभागाच्या साह्यक प्राध्यापकाने त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप करत कुलगुरुंकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने खंडणी मागितल्याचा आरोप असणाऱ्या जनसंपर्क विभागाच्या सहायक प्राध्यापकाला खुलासा मागितला होता. आता त्याच प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पुरावे गोळा करत लवकरच अहवाल देणार असल्याची माहिती कुलगुरु (VC) डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली आहे.
कुलगुरु म्हणाले, सात प्राध्यापकांनी आमच्याकडे लेखी तक्रार दिली होती. या सातही जणांना त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार आल्याची भीती दाखवून, त्याच्यातून सुखरुप सोडवण्यासाठी खंडणी मागण्यात आली होती. आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. खंडणी घेतल्याचा आरोप लागलेल्या सहाय्यक प्राध्यापकाने विद्यापीठाला खुलासा सुद्धा दिला अशी माहिती कुलगुरु यांनी दिली. नवीन समितीमध्ये किती सदस्य पाहिजे, कोण पाहिजे, हे त्यांचाकडून कळल्यावर पुढील प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर लवकरात लवकर अहवाल मिळावा, अशी विद्यापीठाची भूमिका असल्याचे कुलगुरु म्हणाले.
वाचवण्यासाठी माजी अधिकाऱ्याकडून फिल्डिंग?
गंभीर स्वरुपाचे आरोप असताना संबंधिताला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येते. मात्र, डॉ. धवनकर हे कार्यरत असून ते नियमितपणे विविध अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. याशिवाय एका माजी अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांनी तक्रारकर्त्या प्राध्यापकांशी देखील संपर्क साधल्याची चर्चा आहे. सरकार गंभीर झाले असताना कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडून मात्र धवनकर यांचा बचाव करण्यात येत आहे का, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. प्रभारी जनसंपर्क अधिकारी असताना धवनकर हे कुलगुरुंच्या फार जवळ आले होते, हे विशेष.
ही बातमी देखील वाचा
Nagpur ZP : जिल्हा परिषदेच्या 700 कोटींच्या कामांना स्थगिती; माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह काँग्रेस नेते आक्रमक
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI