एक्स्प्लोर

Nagpur Pench Tiger Project: नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी खास 'सायकल सफारी'

पेंच व्याघ्र प्रकल्पात कोलीतमारा ते कुवाराभिवसेन दरम्यान तब्बल 48 किमी लांबीची "चितल सायकल सफारी" पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

नागपूर:  राज्यात सध्या वन्यजीव सप्ताह सुरू आहे. मान्सूननंतर नुकतच राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलं आहे. यानिमित्त नागपूरच्या (Nagpur) पेंच व्याघ्र (Pench Tiger Project) प्रकल्पात पर्यटकांसाठी खास "सायकल सफारी" ही सुरू करण्यात आली आहे. आता पर्यटकांना जिप्सी सफारीसह सायकल सफारीचा आनंदही घेता येणार आहे. विशेष म्हणजे या सायकल सफारीदरम्यान पर्यटकांसोबत सायकलवर चालणरे मार्गदर्शक (गाईड) देखील मिळणार आहे. सध्या या सायकल सफारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पात कोलीतमारा ते कुवाराभिवसेन दरम्यान तब्बल 48 किमी लांबीची "चितल सायकल सफारी" पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या सायकल सफारी दरम्यान पर्यटकांना सोबत सायकलवर चालणरे मार्गदर्शक (गाईड) ही मिळणार आहे. जंगलात एखादी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला कसं सामोर जायचं यासाठी हे मार्गदर्शक प्रशिक्षित असणार आहेत. सोबतच त्यांच्याकडे प्रथमोपचार किटसह अडचणीच्या प्रसंगी आवश्यक औषध आणि साहित्यही उपलब्ध असणार आहे. या सायकल सफारीसाठी अत्याधुनिक गेअर असलेल्या सायकल वन विभागाकडूनच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तीनशे रुपये प्रति सायकल असा दर आहे.

या सायकल सफारी दरम्यान पर्यटक घनदाट जंगलात, वळणदार रस्त्यांवर, निसर्ग संपन्न वन क्षेत्राच्या सानिध्यात सायकल चालवण्याचा आनंद घेता येणार आहे. शिवाय वन्य प्राणी, पक्षी, कीटक यांचे अवलोकन ही ते करू शकणार आहे.  सध्या या सायकल सफारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कशी असेल राज्यातील पहिली जंगल सायकल सफारी? 

  •  कोलितमारा ते कुवारा भिवसिंग अशी एकूण 48 किलोमीटर चे अंतर
  • निसर्गरम्य वातावरणात घनदाट जंगलातून सायकल सफारीचा ट्रेक असल्याने ही आरोग्यदायी सफारी
  • 48 किलोमीटरच्या सफारी दरम्यान हरीण, चितळ, सांभार सारखे तृणभक्षी, विविध प्रजातीचे पक्षी, फुलपाखरू, कीटक आणि नशीब चांगले असल्यास वाघ ही पाहायला मिळेल 
  •  सायकल सफारीसाठी वन विभाग 300 रू दराने अत्याधुनिक सायकल देणार
  • स्वतःची सायकल वापरायची असल्यास 100 रुपये दर
  • सोबत वायरलेस सेट, प्रथमोपचार किट, आणि अत्यावश्यक वस्तूंसह प्रशिक्षित गाईड ही राहणार..
  • सायकल सफारीच्या मार्गावर अनेक आदिवासी गाव त्या ठिकाणी रिफ्रेशमेंट घेता येईल

हे ही वाचा :               

Nagpur News : आता जंगल सफारीचा मिळणार नवा अनुभव, भारतातील पहिली 'बोट जंगल सफारी' नागपुरात सुरु होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget