एक्स्प्लोर

Department of Revenue : महसूल विभागातील विभागीय चौकशीसाठी 'टाईम लाईन' ठरली ; सेवाविषयक अडचणी संपणार!

Nagpur : विभागीय चौकशीच्या नावाखाली यापुढे वेळकाढूपणा चालणार नाही. कोणतीही विभागीय चौकशी केवळ सहा महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. याचा महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे.  

Department of Revenue News : महसूल विभागातील (Department of Revenue) अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवाविषयक अडचण लवकरच दूर होणार आहे. अशांविरूध्द सुरू करण्यात आलेली विभागीय चौकशी सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा तातडीने  होईल. यासाठी सूत्रबध्द कार्यक्रमाची आखणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

महसूल विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा कालबद्ध कार्यक्रम आखून करण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सर्व सेवाविषयक अडचणी दूर होणार आहेत. यासाठी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट निवडसूची वर्ष निर्धारित केले असून कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी सहा महिने इतक्या कालावधीत पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

Department of Revenue Nagpur: सेवाविषयक समस्यांचा गुंता सुटणार?

जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा महसूल विभाग आहे. मात्र या विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवाविषयक समस्या गुंता वाढलेला आहे. यावर तोडगा काढताना महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी एक सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. निवडसूची वर्ष जाहीर करून दरवर्षी त्या कालावधीत पदोन्नती ते नियुक्ती या दरम्यानच्या सर्व सेवाविषयक प्रक्रिया एका विशिष्ठ वेळेत पूर्ण करण्याचा तक्ता प्रसिद्ध केला आहे. याचबरोबर विभागीय चौकशीच्या नावाखाली यापुढे वेळकाढूपणा चालणार नाही. कोणतीही विभागीय चौकशी केवळ सहा महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. याचा महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे.  

चौकशीच्या नावावर चालढकल होणार बंद?

पदोन्नतीसाठीच्या याद्या मागवणे, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे, गोपनीय अहवाल मागवणे यांसारख्या सर्व बाबी एका कालबद्ध पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत. यात कोणाला चालढकल करता येणार नाही. अशा प्रकारे केलेल्या आखणीमुळे नियमित बदल्या करतेवेळी सुसूत्रता येणार आहे.

वेळेत सुटणार चौकशीचा सरेमिरा

विभागीय चौकशीच्या नावावर पदोन्नती, नियुक्ती या संदर्भात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागे चौकशीचा सरेमिरा लावून त्यांना पदोन्नती तसेच नवीन नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे अनेक आरोप आधी झाले आहे. त्यामुळे आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवा संदर्भातील समस्यांचा निपटाला ठरलेल्या 'टाईम लाईन'नुसार होणार आहे.

ही बातमी देखील वाचा...

Nagpur News : मनपाच्या नोकरभरतीवर टांगती तलवार; निवृत्तीधारकांच्या पेंशनवर महिन्याला 17 कोटींचे खर्च

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
Embed widget