एक्स्प्लोर

Nagpur : आता शहरातील अनधिकृत भूखंडांची होणार मोजणी; सिटी सर्व्हे कार्यालयातील फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

सध्या असलेल्या अनधिकृत ले-आऊटमध्ये अनेक भूखंडांची मोजणी झाली नाही. त्यामुळे त्यांना आरएल (RL) देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अजूनही अनेक ले-आऊट एनए सुद्धा झाले नाही.

नागपूरः वाढत्या लोकसंख्येसह शहराच्या विस्तारासोबत शहरात मान्यता नसलेल्या लेआऊटच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली. यामध्ये अनेक भूखंडांची योग्य पद्धतीने मोजणी झाली नाही. अशा भूखंडांची मोजणी करणे, रस्त्यासाठी जागा निश्चित करणे आदी कामासाठी नासुप्रने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. नासुप्रच्या (nagpur improvement trust) बैठकीत मेसर्स वेव्हस टेक इंडिया या कंपनीची निविदा मंजूर केल्याने अनधिकृत ले आऊटमधील हजारो भूखंडधारकांना मोजणीसाठी सिटी सर्व्हे (city survey nagpur) कार्यालयाच्या कटकटीपासून दिलासा मिळणार आहे.

नासुप्र विश्वस्त मंडळाची बैठक सदर येथील कार्यालयात पार पडली. बैठकीत नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी (district collector) डॉ. विपिन इटनकर, मनपा (nmc commissioner) आयुक्त राधाकृष्णन बी., विश्वस्त आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakre), संदीप इटकेलवार, नगररचना विभागाच्या सहसंचालक सुप्रिया थूल उपस्थित होत्या. या बैठकीत अनधिकृत ले-आऊटमधील भूखंडांची मोजणी करण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काही भूखंडांचे एनएही प्रलंबित

सध्या असलेल्या अनधिकृत ले-आऊटमध्ये अनेक भूखंडांची मोजणी झाली नाही. त्यामुळे त्यांना आरएल (RL) देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अजूनही अनेक ले-आऊट एनए सुद्धा झाले नाही. त्यामुळे या भूखंडांची मोजणी करणे, या लेआऊटमध्ये मोकळी जागा व रस्त्यांसाठी जागा निश्चित करण्याकरिता मेसर्स वेव्हट टेक इंडिया या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत अनधिकृत ले-आऊट एनए करण्याचीही ग्वाही दिली. त्यामुळे नागरिकांची सिटी सर्वे कार्यालयात अनेक महिने फेऱ्या मारण्याचा त्रास कमी होणार आहे. लवकरच डिमांड भरल्यानंतर लगेच स्वयंचलित पद्धतीने आरएल जनरेट करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येत असल्याचे नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

प्लॉटधारकांना आरएल मिळण्याचा मार्ग मोकळा

या नव्या एजन्सीच्या माध्यमातून लेआऊटमधील भूखंडांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सिटी सर्वे कार्यालयात मोजणीसाठी फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. कंपनीने मोजणी केल्यानंतर ले-आऊटचे एनए होईल तसेच भूखंडधारकांना आरएल देण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. नागरिकांना डिमांड मिळेल. ती भरताच आरएल मिळणार आहे.

डिसेंबरपर्यंत 70 हजार भूखंड नियमित

सध्या गुंठेवारीअंतर्गत ले-आऊटमधील भूखंडांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. अनेकांचे भूखंड नियमित करण्यात आले. अनेकांचे भूखंड नियमित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. डिसेंबरपर्यंत 70 हजार भूखंड नियमित होईल, अशी माहिती नासुप्र अधिकाऱ्यांनी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hingoli Farmers : हिंगोली जिल्ह्यातील संपावर असलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget