एक्स्प्लोर

Nagpur News : 'सब-वे' च्या निर्मितीमुळे डझनभर रेल्वे गाड्या रद्द; ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय

इतवारी रेल्वेस्थानकावर बनविण्यात येत असलेल्या सब-वे करिता बॉक्स पुशिंगचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे काही काळ रेल्वे ब्लॉक करण्यात येत आहे. परिणामी त्याचा थेट फटका हा रेल्वे वाहतुकीवर होणार आहे.

Nagpur News : उपराजधानी नागपूर (Nagpur News) शहरातील इतवारी रेल्वेस्थानकावर कळमना दिशेकडे बनविण्यात येत असलेल्या सब-वे करिता बॉक्स (एलएचएस) पुशिंगचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे काही काळ रेल्वे ब्लॉक करण्यात येत आहे. परिणामी त्याचा थेट फटका हा रेल्वे वाहतुकीवर होणार असून मे महिन्यात वेगवेगळ्या वेळेस रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहेत. तूर्त दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वेने सुमारे डझनभर गाड्या नियोजित तारखांना रद्द केल्याची माहितीही पुढे आली आहे. ऐन उन्हाळी सुट्या आणि लग्न समारंभाच्या हंगामात प्रवाशांची गर्दी वाढत असताना, करण्यात आलेला हा ब्लॉक प्रवाशांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. 

या रेल्वेगाड्यांना फटका 

इतवारी रेल्वेस्थानकावर कळमनाच्या दिशेकडे  बनविण्यात येत असलेल्या सब-वेकरिता एलएचएस पुशिंगचे काम 8 मे पासून 30 मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे 08711/08712 डोंगरगड-गोंदिया- डोंगरगड मेमू, 08713, 08716 गोंदिया-सुभाष चंद्र बोस (इतवारी)- गोंदिया, 08751/08756  इतवारी-रामटेक-इतवारी मेमू पॅसेंजर स्पेशल 08754/08755 इतवारी रामटेक-इतवारी मेमू 08714/08715 इतवारी-बालाघाट- इतवारी मेमू 08281 इतवारी-तिरोडी पॅसेंजर,08284/08283 तिरोडी- तुमसर-तिरोडी पॅसेंजर 8 ते 11 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याच कालावधीत 08282 तिरोडी- इतवारी पॅसेंजर, 18109/18110 टाटानगर-इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस, 11201/11202 नागपूर- शहाडोल- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या गाड्या

इतवारी-रिवा एक्स्प्रेस 8, 10, 11,13, 15, 17, 20, 22, 24, 25, 27, 29 आणि 31 मे रोजी रद्द राहील 

रिवा-इतवारी एक्स्प्रेस 7, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 21, 23, 24, 26, 28 आणि 30 मे रोजी रद्द राहील

11201 नागपूर-शहडोल एक्स्प्रेस 19 ते 30 मे पर्यंत तर, 11202 शहडोल-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 20 ते 31 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे

हमसफर एक्स्प्रेसमधून मद्यसाठा जप्त

सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी असल्याचे चित्र आहे. याच संधीचा फायदा घेत रेल्वेतून अमली पदार्थांच्या तस्करीला उत आला आहे. अशीच एका छुप्या  कारवाईचा छडा रेल्वे पोलिसांचा प्रिन्स नामक श्वानाने लावला आहे. तिरूपती एक्स्प्रेसमधून होत असलेल्या मद्य तस्करीचा छडा लावून प्रिन्सने मोठा मद्यसाठा पकडून दिलाय. विशेष म्हणजे, या कारवाईला बरेच तास होऊनही रेल्वे सुरक्षा दलाकडून मद्य तस्करांची नावे उघड करण्याची तसदी घेतली गेली नाही. 

तिरूपती हमसफर एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर आली असताना आरपीएफचे जवान प्रिन्सनामक श्वानासह या गाडीची तपासणी करू लागले. कोच नंबर बी-4 मध्ये 15, 45 आणि 52 नंबरच्या सीटखाली तीन संशयास्पद पिशव्या आढळल्या. प्रिन्सच्या संकेतानंतर पिशव्या तपासल्या असता त्यात इंग्लिश मद्याच्या वेगवेगळ्या 38 बाटल्या आढळल्या. या मद्याची किंमत 88 हजार 500 रुपये आहे. आरपीएफने हा मद्यसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Embed widget