Nagpur News: महामेट्रोचा नागपूरकरांना दिलासा; आजपासून मेट्रो प्रवास होणार स्वस्त, विद्यार्थांना 30 टक्के सवलत
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेता महामेट्रोने प्रवासी भाड्यामध्ये बदल केले आहे. सध्याच्या भाड्याच्या तुलनेत 33 टक्क्यांनी दरात कपात करण्यात आली आहे.
Nagpur Metro: उपराजधानी नागपूरात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना महामेट्रोने (Nagpur Metro) मोठा दिलासा दिला आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेता, महामेट्रो नागपूरने प्रवासी भाड्यामध्ये बदल केले आहे. आज 1 मार्च पासून हे नवे दर लागू होतील. हे दर सध्याच्या भाड्याच्या तुलनेत 33 टक्क्यांनी कमी असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. सोबतच या नव्या दरात देखील विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलती दरामुळे मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असून नागपूरकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवासी भाड्याच्या दरात 33 टक्क्यांची कपात
या सवलती अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंतचा प्रवास आता 30 रुपयांऐवजी 25 रुपये आणि विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलतीसह 18 रुपये द्यावे लागतील. प्रवाशी संख्या वाढविण्याचा उद्देशाने महामेट्रोने प्रवाशांकरिता 'कॅश बॅक'ची संकल्पनादेखील राबविण्यात येणार असून ही योजना लवकरच लागू होणार आहे. या सेवेअंतर्गत एका महिन्यात महाकार्ड वापरणाऱ्या प्रवाशाला मेट्रोने प्रवास करत तिकीट दराच्या माध्यमातून एकूण 800 रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला कॅश बॅकच्या माध्यमातून 10 टक्के पॉइंट मिळेल. या योजनेला अंतिम स्वरूप देण्याबाबत काम सध्या विचाराधीन आहे. मेट्रोने विकेंड सवलत 30 टक्के, राजपत्रित सुटी 30 टक्के आणि डेली पास 100 रुपये या उपाययोजना केल्या आहेत.
36 स्टेशन कार्यरत
सध्या खापरी, प्रजापतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि लोकमान्यनगर या चार टर्मिनल स्थानकांवरून दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू आहे. मेट्रोच्या 40. 02 किमीच्या प्रवासात 36 स्टेशन कार्यरत आहेत. मेट्रोने नुकतेच आठ मेट्रो स्थानकांवर फीडर ऑटोरिक्षा सेवा आणि मनपा व एमआयएलच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत शटलबस सुरू केली आहे.
असे असतील दर
मार्ग | सध्याचे दर (रु) | सुधारित दर (रु) | विद्यार्थ्यांना सवलत |
लोकमान्यनगर ते सीताबर्डी | 30 रुपये | 25 | 18 रुपये |
लोकमान्यनगर ते शंकरनगर | 25 रुपये | 20 रुपये | 14 रुपये |
शंकरनगर ते सीताबर्डी | 15 रुपये | 10 रुपये | 7 रुपये |
शंकरनगर ते चितारओळ | 25 रुपये | 20 रुपये | 14 रुपये |
सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक | 25 रुपये | 20 रुपये | 14 रुपये |
सीताबर्डी ते चितारओळ | 15 रुपये | 10 रुपये | 7 रुपये |
सीताबर्डी ते खापरी | 30 रुपये | 25 रुपये | 18 रुपये |
प्रजापतीनगर ते चितारओळ | 20 रुपये | 15 रुपये | 11 रुपये |
उज्ज्वलनगर ते चितारओळ | 30 रुपये | 25 रुपये | 18 रुपये |
इतर महत्वाच्या बातम्या