Nagpur News : 12 दिवसांनी तरुणीवर अत्याचार केलेल्या आरोपीला अटक, तर नागपुरातील महिलांसाठी असुरक्षित ठिकाणांच्या संख्येतही वाढ
Nagpur News : नागपूर सध्या महिलांसाठी आधीच्या तुलनेत अधिक असुरक्षित असल्याचं पाहायला मिळात आहे. कारण नागपुरातील महिलांसाठी असुरक्षित असलेल्या ठिकणांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नागपूर : नागपुरातील (Nagpur) हिंगणा पोलीस स्थानकाअंतर्गत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला होता. त्या घटनेला 12 दिवस उलटून गेल्यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेला आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचा नव्हता. तो त्या दिवशी महाविद्यालयाजवळ फिरत होता. त्या दिवशी महाविद्यालय जवळ फिरत असताना त्याने एकट्या विद्यार्थिनीवर हल्ला करत तिला झाडी झुडुपात ओढून नेले होते. सध्या या आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहेत. दरम्यान नागपुरातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपुरातील महिलांसाठी असुरक्षित असलेल्या ठिकणांची संख्या वाढली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. नागपुरातील एकूण 230 ठिकाणं ही महिलांसाठी असुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागपुरातील या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सध्या त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान या आरोपीवर यापूर्वी चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण महिलांसदर्भात एकही गुन्हा त्याच्या विरोधात दाखल नसल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर?
दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत घडलेल्या या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी नागपुरातील महिलांच्या सुरक्षेचा अनुषंगाने महिलांसाठी धोकादायक ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. त्याप्रमामे नागपुरातील 230 ठिकाणं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी नागपुरात महिलांसाठी असुरक्षित अशी 178 ठिकाणं होती. त्यामुळे आधीच्या तुलनेत नागपुरात आधीच्या तुलनेत महिलांसाठी कमी सुरक्षित शहर झालं आहे का असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
तर या सर्व ठिकाणांवर नियमितपणे प्रवास करणाऱ्या महिला आणि तरुणींना जागृत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागपुरातील महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत पोलीस प्रशासन देखील आता सुसज्ज झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
नागपुरातील वर्धा रोडवर निर्जन रस्त्यावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावरुन झाडी झुडूपांच्या निर्जन रस्त्यावरून महाविद्यालयकडे जात असताना अज्ञात आरोपीनं कुऱ्हाडीचा धाक दाखवत पीडित विद्यार्थिनीला झाडी झुडुपात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केला. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली, दरम्यान त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी या संदर्भातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
Nagpur : कॉलेजला निघालेल्या तरुणीवर अत्याचार, निर्जनस्थळी झुडपात नेऊन कृत्य, नागपूर हादरलं