Nagpur Ganeshotsav 2022 : गणेश मंडपातून आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी घेतले बुस्टर डोस
आतापर्यंत शहरातील विविध भागातील 198 गणेश मंडपांमध्ये राबविण्यात आलेल्या लसीकरण अभियानात 8056 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे.
![Nagpur Ganeshotsav 2022 : गणेश मंडपातून आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी घेतले बुस्टर डोस Nagpur Ganeshotsav So far more than eight thousand citizens have taken booster doses from Ganesh Mandal Nagpur Ganeshotsav 2022 : गणेश मंडपातून आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी घेतले बुस्टर डोस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/8c03e846546397aed540f00f1ba01b98166247592707589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे (Nagpur Municipal Corporation) शहरातील गणेश मंडपांमधून कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस (Booster Dose) लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) माध्यमातून आरोग्य जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण मोहिम राबविण्याबाबत मनपा आयुक्त तथा राधाकृष्णन बी. यांनी निर्देशित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाद्वारे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात (Ganeshotsav 2022) लसीकरण मोहिम राबविण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बुस्टर डोस लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
आपल्या जवळच्या गणेश मंडळातून घ्या बुस्टर डोस
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातून राबविण्यात येत असलेल्या लसीकरण (vaccination) मोहिमेद्वारे मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी 52 गणेश मंडपांमध्ये लसीकरण अभियान राबवून 1827 जणांना बुस्टर डोस देण्यात आला. आतापर्यंत शहरातील विविध भागातील 198 गणेश मंडपांमध्ये राबविण्यात आलेल्या लसीकरण अभियानात 8056 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. ज्या परिसरातील गणेश मंडपामध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात येते. तेथील परिसरातील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूद्वारे लसीकरणाचे कार्य केले जाते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोज घेतलेल्या 12 वर्षावरील पात्र व्यक्तींनी अद्यापही बुस्टर डोस घेतलेला नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या गणेश मंडपामध्ये जाउन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
कोर्बेव्हॅक्सचे सुद्धा बुस्टर डोस
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर आता कोर्बेव्हॅक्स लसीचे सुद्धा बुस्टर डोस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड यापैकी कुठल्या एका लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या 18 वर्षावरील नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचे बुस्टर डोस घेता येत आहे. यापूर्वी 12 ते 15 या वयोगटातील मुलांनाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जात होते. राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांनी पहिला व दुसरा डोस ज्या प्रकारचा घेतला आहे त्याच प्रकारचा प्रिकॉशन डोस घेता येत होता. आता 18 वर्षावरील नागरिकांनी पूर्वी पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड लसीचे घेतले असतील अशा नागरीकांना कोर्बेव्हॅक्स लस प्रिकॉशन (बुस्टर) डोस म्हणून घेता येणार आहे. सदर लसीची प्रिकॉशन (बुस्टर) डोससाठी नोंद कोविन प्रणालीवर करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुस्ती कोविन पोर्टलवर करण्यात आलेली आहे, असेही प्राप्त पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन किंवा कोर्बेव्हॅक्स या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडयाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस दिला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur Ganesh Visarjan : 'या' लिंकवर मिळेल नागपुरातील 204 ठिकाणच्या 390 कृत्रिम विसर्जन टँकची माहिती
BMC Elections 2022 : मुंबई महानगरपालिकेवर भाजपा-शिंदे सेनेचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)