एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात ट्रक ड्रायव्हरचा अमानवीय छळ, छताला लटकवून दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण, व्हिडीओ व्हायरल
काल अचानक तो दिसल्यानंतर त्याला बळजबरीने वडधामना परिसरात कार्यालयात नेण्यात आले. यावेळी त्याला मारहाण करत त्याचा अमानवीय छळ केले गेले. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. तेच व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.
नागपूर : नागपुरात काही लोकं मिळून एका ट्रक ड्रायवरचा अमानवीय छळ करत त्याला जबर मारहाण करत असल्याचे एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओ नागपूरच्या वडधामना परिसरातला असून इथल्या आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयातील काल दुपारचा असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाला छतावरील पंख्याच्या हुकला दोरीने लटकवून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोबतच सदर तरुणासोबत अमानवीय कृत्य देखील केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
माहितीनुसार, संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक ड्रायव्हर विक्की सुनील आगलावे (23) ला ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य थिरुवनंतपुरमला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी विक्की आगलावेला रस्त्यातील टोल आणि इतर खर्चासाठी 35 हजार रोख रक्कम दिली होती. शिवाय 12 हजार रुपयांचे डिझेलही भरून दिले होते. मात्र संबंधित विक्की आगलावेने ट्रक थिरुवनंतपुरमला न नेता नागपुरातच सर्व पैसे खर्च केले. शिवाय ट्रकमधले 12 हजारांचे डिझेलही कुणालातरी विकून मालकासोबत दगाबाजी केली, असा आरोप आहे.
त्यानंतर संबंधित ट्रक ड्रायव्हर बरेच दिवस बेपत्ता झाला होता. काल अचानक तो दिसल्यानंतर त्याला बळजबरीने वडधामना परिसरात कार्यालयात नेण्यात आले. यावेळी त्याला मारहाण करत त्याचा अमानवीय छळ केले गेले. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. तेच व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.
विक्की आगलावेला छतावरील पंख्याच्या हुकला दोरीने लटकवून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करत पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement