Nagpur Crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क दोन बहिणींना पळवलं; पोलिसांनी 24 तासांच्या आत चार संशयितांना घेतलं ताब्यात
Nagpur Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन युवकांनी मित्राच्या दोन्ही बहिणींना पळवल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
![Nagpur Crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क दोन बहिणींना पळवलं; पोलिसांनी 24 तासांच्या आत चार संशयितांना घेतलं ताब्यात Nagpur Crime news trapped two sisters into the love with false assurance but police caught the four accused in just 24 hours maharashtra marathi news Nagpur Crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क दोन बहिणींना पळवलं; पोलिसांनी 24 तासांच्या आत चार संशयितांना घेतलं ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/25/eb06be786308ead4e4e0404b0302634f1708840084062892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन युवकांनी मित्राच्या दोन्ही बहिणींना पळवल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या (Nagpur Crime) सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या (Nagpur Police) हद्दीत घडला आहे. बांधकामावर आलेल्या दोन युवकांनी त्याच्या मित्राच्या दोन्ही बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने घरी कुणी नसताना दोघींनाही मध्य प्रदेशात पळवून नेले. ही बाब भावाला माहिती पडताच त्याने या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. परंतु, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने अवघ्या 24 तासाच्या आत या दोन्ही मुलींची सुटका करून या प्रकरणातील चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क दोन बहिणींना पळवलं
राजू बल्लू गोस्वामी (20) आणि देवा चेतराम गोस्वामी (24) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत, तर मोहन चेतराम गोस्वामी (20), मोन्टी बल्लू गोस्वामी (20) अशी इतर संशयित दोन आरोपींची नावे असून त्यांनी या कारवाईत मदत केल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित 17 आणि 19 वर्षीय तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. त्यांचा भाऊ नागपुरातील निर्माणाधीन इमारतीवर मोलमजुरीचे काम करतो. महिनाभरापूर्वी दोन्ही बहिणी कामाच्या शोधात भावाकडे राहायला आल्या. दरम्यान, भावाच्या सोबत काम करणारे मित्र राजू आणि देवा हे या युवतींच्या भावाच्या घरी येत होते. या दरम्यान त्यांची या दोन्ही बहिणीवर नजर गेली. त्यानंतर त्यांच्यात ओळख निर्माण होऊन दोघांनीही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे अनेक खोटे आश्वशन देत त्यांनी दोघींनाही पळवून नेण्याचा बेत आखला.
अवघ्या 24 तासांच्या आता मुलींचा शोध
दोन्ही बहिणी घरी औषधी आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या आणि या मुलींना घेऊन राजू आणि देवाने पळ काढत शिवनी शहर गाठले. भाऊ घरी आला असता त्याला दोन्ही बहिणी घरात नसल्याचे आढळून आले. त्याने बऱ्यांच वेळ वाट पाहून आजूबाजूला चौकशी केली. मात्र त्यांचाशी काही केल्या संपर्क झाला नाही. अखेर भयभीत झालेल्या भावाने थेट सिताबर्डी पोलीस स्टेशन गाठून या बाबत तक्रार नोंदवली. सोबतच राजू आणि देवावर संशय असल्याचे देखील त्याने सांगितले. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान केले. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी आणि मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची तपासणी केली असता हे सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या पीडित मुलींची सुटका केली. तर चारही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)