Nagpur News : भर वस्तीत मोकाट वळुंची चित्तथरारक झुंज; अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Nagpur News : नागपुरातील सदगुरुवाडी परिसरात सोमवारी सकाळी दोन मोकाट वळुंची तुफान झुंज बघायला मिळाली. तब्बल अर्धा तास चाललेल्या या झटापटीत जवळ जवळ 8 ते 9 वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
![Nagpur News : भर वस्तीत मोकाट वळुंची चित्तथरारक झुंज; अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद nagpur bulls fight many vehicles Damage due to fight incident in cctv camera maharashtra news Nagpur News : भर वस्तीत मोकाट वळुंची चित्तथरारक झुंज; अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/051682b4570b3a74ebfd6aba436234ee1704702354369892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपुर : नागपुरातील सदगुरुवाडी परिसरात आज सकाळी दोन मोकाट वळुंची (Bull Fight) तुफान झुंज बघायला मिळाली. तब्बल अर्धा तास चाललेल्या या झटापटीत जवळ जवळ 8 ते 9 वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यातील ही सलग दुसरी घटना असून परिसरात या वळुंची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या वळुंच्या झुंजीत एका जेष्ठ वृद्धाला गंभीररित्या जखमी केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार करावे लागले.
सातत्याने होणाऱ्या या घटनांचे गांभीर्य लक्ष्यात घेता प्रशासनाने योग्य करावाई करणे अपेक्षित आहे. मात्र तक्रार करून देखील अद्याप कुठलीही उपाययोजना न केल्याने स्थानिकांच्या मानत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या वळुंच्या झुंजीत मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मोकाट वळुंचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
परिसरात वळुंची मोठी दहशत, अनेक वाहनांचे केले नुकसान
नागपूरच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण झाला असून अनेक अपघात देखील घडत असतात. अशा जनावरांना दिवसा मोकाट सोडणाऱ्या पशुमालकांमुळे अवघे नागपूरकर त्रस्त आहेत. अशीच एक थराराक घटना नागपूरच्या सदगुरूवाडी परिसरात आज सोमवार, 8 जानेवारीच्या सकाळी घडली. ज्यामध्ये दोन एकसमान शरीरयष्टी असलेले वळू एकमेकांसोबत भिडले. जवळ जवळ अर्धा तास चाललेल्या या लढाईत परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परीसारतील नागरिकांनी वळुंना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फार यश आले नाही. परिणामी या झटापटीत परिसरातील 8 ते 9 वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच अशी एक घटना यांच परिसरात घडली होती. त्यावेळी देखील वाहनांचे आणि एका वृद्ध व्यक्तीला गंभीर स्वरूपात इजा झाली होती. वारंवार होणाऱ्या या घाटनांमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मोकाट जनावरांमुळे नागपूरकर त्रस्त
नागपुरातील काही भागात गोठ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. अनेक जण त्यांच्याकडील जनावणे रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा अशा जनावरांना पकडून गोरक्षणाला सुपुर्द करण्यात येते. नंतर दंड भरून ते सोडविले जातात. परत, ही जनावरे रस्त्यांवर येतात. मनपा कारवाई करीत असली तरी कडक कायदा नसल्याने या पशुमालकांचे चांगलेच फावते. वाहतुकीला अडचणी, रस्त्यांच्या मध्येच बसून अपघाताला कारणीभूत होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा मोकाट जनावरांवर कारवाई केल्यास पथकांवर हल्लेही होतात. मात्र, नागरिकांच्या तक्रारींमुळे आणि अशांवर वचक असावा म्हणून कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. मात्र तक्रार करून देखील अद्याप कुठलीही उपाययोजना न केल्याने स्थानिकांच्या मानत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या वळुंच्या झुंजीत मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, या झुंजीत वळू देखील गंभीर जखमी होत असतात. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मोकाट वळुंचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)