Municipal Corporation Election 2025: 29 महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, नागपूर, चंद्रपूर अमरावतीसह अकोल्यात मतदान अन् निकाल कधी? वाचा सविस्तर
Municipal Corporation Election 2025: राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचे अखेर आज बिगुल वाजले आहे. दरम्यान, विदर्भात चार महानगरपालिकेसाठी निवडणुकांची रणधुमाळी नेमकी कधी होणार? हे जाणून घेऊ

Nagpur MC Election News : राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचे अखेर आज बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Municipal Corporation Election 2025) जाहीर केलाय. सोबतच आजपासून (15 डिसेंबर) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतदानाचा निकाल लागणार आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान, नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी राजकीय पक्षांकडे केवळ 29 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, विदर्भात चार महानगरपालिकेसाठी निवडणुकांची रणधुमाळी नेमकी कधी होणार? हे जाणून घेऊ
Nagpur MC Election News: विदर्भात चार महानगरपालिकेसाठी निवडणुकांची रणधुमाळी
विदर्भात चार महानगरपालिकेसाठी निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. यात चारपैकी अकोला आणि अमरावतीचा मार्ग मोकळा आहे. कारण या दोन महानगरपालिकेतील आरक्षण 50% पर्यंतच्या आत मर्यादित आहे. मात्र नागपूर आणि चंद्रपुरात आरक्षणाची मर्यादा फार पुढे गेली आहे. असं असलं तरी ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली असली तरी अशा ठिकाणीही तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या दिले आहे. परिणामी आता नागपूर चंद्रपूरसह विदर्भात चार महानगरपालिकेसाठीही 15 जानेवारीलाच मतदान होणार आहे.
MC Election News: विदर्भातील निवडणुका आणि एकूण जागा
1. नागपूर – 151
2 अकोला - 80
3 अमरावती - 87
4 चंद्रपूर - 66
MC Election Schedule : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
Municipal Corporations Election Schedule : असा असेल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम?
⦁ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
⦁ अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
⦁ उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
⦁ चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
⦁ मतदान - 15 जानेवारी
⦁ निकाल - 16 जानेवारी
एकूण मतदार - 3.48 कोटी
एकूण मतदार केंद्र - 39,147
मुंबईसाठी मतदार केंद्र - 10,111
कंट्रोल यूनिट - 11,349
बॅलेट यूनिट - 22,000
Election Spending Limit : निवडणूक खर्चाची मर्यादा
महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.
अ वर्ग - 15 लाख
ब वर्ग - 13 लाख
क वर्ग - 11 लाख
ड वर्ग - 9 लाख























