एक्स्प्लोर

विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा

Maharashtra Assembly Election 2024 : विदर्भातील 62 विधानसभेच्या जागांपैकी 29 जागांवर महविकास आघाडीतील जागावाटपाचा कोणताच वाद नसल्याची माहिती मिळत आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharshtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत विदर्भातील 62 जागांपैकी 29 जागांचे जागावाटप ठरल्याचे समोर येत आहे. 

विदर्भातील 62 विधानसभेच्या जागांपैकी 29 जागांवर महविकास आघाडीतील जागावाटपाचा कोणताच वाद नसल्याची माहिती मिळत आहे. या 29 जागांवर तीन पक्षांपैकी एकाच पक्षाने मागणी केल्याने त्या पक्षासाठी ती जागा सुटायला मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विदर्भातील 29 विधानसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीतील जागावाटप निकाली निघाल्यात जमा आहे. 

'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा

यात नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण पश्चिम नागपूर , पश्चिम नागपूर , उत्तर नागपूर, मध्य नागपूर विधानसभा जागांचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील साकोली, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, वर्धा जिल्ह्यातील देवळी, वाशीम जिल्ह्यातील रिसोड अशा प्रत्येकी एक विधानसभेचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा या चार  विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकाच घटक पक्षाने दावा केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा याचा पाच  विधानसभेवर एकाच पक्षाने दावा केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला व अकोला पूर्व या विधानसभेचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ,राळेगाव,उमरखेड या विधानसभांच्या समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर,खामगाव व शिंदखेडा राज या तीन विधानसभांचा समावेश आहे.

विदर्भात महायुतीला फटका बसणार? 

दरम्यान, विदर्भात (Vidarbha) भाजपनं (BJP) एक अंतर्गत सर्व्हे केल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. या सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त 25 जागा मिळत असल्याचे समजते. विदर्भात भाजपला 18, तर शिवसेनेला 5 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे समजते. यामुळे विदर्भात महायुती मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget