Nanded : श्रीरामाच्या दर्शनासाठी नांदेड ते अयोध्या पायी प्रवास, किनवटच्या ध्येयवेड्या तरूणाचा प्रवास
Ram Mandir Ayodhya : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे राहणाऱ्या 34 वर्षीय अरुण दुधीवार याने अयोध्येपर्यंतचा 1100 किमीची प्रवास पायी पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं आहे.
नांदेड : कोट्यवधी देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) निर्माणाचे कार्य अंतिम टप्प्यात असून या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची साऱ्यानांच उत्सुकता लागली आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या पुढाकारातून आणि देशभरातील तमाम रामभक्तांच्या इच्छाशक्तीतून या राम मंदिर (Ram-Temple) निर्मितीचा संकल्प पूर्णत्वास येणार आहे. या निमित्ताने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मनोकामना पूर्ण होणार आहे. याच भावनेतून नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट (Kinwat) इथला एक ध्येयवेडा तरुण एकटाच आयोध्यातील राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघाला आहे.
किनवट ते आयोध्य एकटाच करणार अकराशे किमीचा प्रवास
अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) हे तमाम भारतीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थान आहे. या मंदिराच्या निर्मितीने अनेकांचे स्वप्न सत्यात अवतारणार आहे. या मंदिराच्या लोकार्पणची तारीख सुनिश्चित झाल्यापासून साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे राहणाऱ्या 34 वर्षीय अरुण दुधीवार यांची देखील अशीच काहीशी भावना आहे. या भावनेतूनच या तरुणाने थेट अयोध्या गाठण्याचा संकल्प केला आहे. तेही चक्क पायी! 3 नोव्हेंबर रोजी किनवट येथून त्यांने कुणालाही न कळवता अतिशय मोजक्या साहित्यसह या पायी प्रवासाला सुरुवात केली. किनवट ते अयोध्या असे तब्बल अकराशे किलोमीटरचा प्रवास 80 दिवसात पूर्ण करून तो 22 जानेवारी पूर्वी अयोध्येत पोहचेल असा मानस आहे. अशी माहिती अरुण दुधीवार यांनी बोलतांना दिली.
प्रभू श्रीराम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मार्ग सुखद
भारत देश हा जागतिक महासत्ता व्हावा, समाजातील सर्व स्थरात एकता, समृद्धी आणि शांती प्रस्थापित व्हावी, कष्टाकरी, कामकरी, शेतकरी यांच्या आयुष्यात भरभराटी राहावी अशी प्रार्थना प्रभू श्री रामचंद्राजवळ करण्यासाठी माझा हा प्रवास आहे. कुठलाही गाजावाजा न करता तसेच घरी देखील न कळवता मी या पदयात्रेची सुरुवात केली. दिवसाला मी रोज 40-50 कि.मी चा पायी प्रवास करतो. या प्रवासात मला समाजातील लोकांनी फार सहकार्य केले आहे. आपण सर्व ईश्वरचे लेकरे आहे आणि त्यातूनच मला या कार्यासाठी शक्ती मिळते असे मत अरुण दुधीवार यांनी बोलताना व्यक्त केले.
ही बातमी वाचा: