एक्स्प्लोर
संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, स्मृती इराणींना उद्देशून जयदीप कवाडेंचं वादग्रस्त वक्तव्य
जयदीप नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलत होते. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीपला बाजूला बसवून शाबासकीही दिली.
नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याच भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही असं वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केलं.
जयदीप नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलत होते. जयदीय यांनी स्मृती इराणी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली त्यावेळी इतर अनेक मान्यवर त्याठिकाणी उपस्थित होते. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीपला बाजूला बसवून शाबासकीही दिली.
जयदीप यांच्या या आक्षेपार्ह भाषणानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. निवडणूक म्हटलं की टीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र टीका करतान सर्वच पक्षातील नेत्यांना विशिष्ट मर्यादा पाळणे गरजेचे असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
नाशिक
राजकारण
Advertisement