एक्स्प्लोर

पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरुवात, रथ यात्रेचे आहे महाराष्ट्र कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर

Rath Yatra 2023 :  जगन्नाथ पुरीची ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे.

Jagannath Puri Rath Yatra 2023 :  जगन्नाथ पुरीची ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे.  याच ऐतिहासिक रथयात्रेचं महाराष्ट्र कनेक्शनही आहे. मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी खास संबंध राहिला आहे. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातून ऐतिहासिक रथयात्रा निघते. यामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढतात. मात्र या रथयात्रेचे महाराष्ट्राची एक आगळे वेगळे संबंध आहे....

भोसले राजघराण्याचे प्रथम रघुजीराजे भोसले यांनी 1751 मध्ये मोगलांसाठी बंगाल आणि ओडिशा नियंत्रित करणाऱ्या तत्कालीन नवाब अलीवर्दी खानचा पराभव केला होता. अलीवर्दी खान याला पराभूत केल्यानंतर जेव्हा रघुजी राजे ओडिशाला पोहोचले, तेव्हा मुस्लिम सत्ताधार्यांनी पुरीच्या मंदिराची काय दुरावस्था केली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रघुजी राजे भोसले यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्याकाळी चाळीस लाख रुपये खर्च करत अन्नछत्र, भोज कक्ष, 22 पेक्षा जास्त धर्मशाळा यांचे निर्माण केले होते. एवढेच नाही तर मंदिराला हजारो एकर जमीन देऊन आर्थिक दृष्ट्या मंदिर स्वतःच्या पायावर उभे राहील अशी व्यवस्था केली होती. 

रघुजीराजे भोसले यांच्या संरक्षणात मुस्लिम आक्रमणामुळे काही काळ बंद पडलेली जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली होती. रघुजी राजेंनी दरवर्षीच्या यात्रेसाठी प्रति वर्ष वीस हजार रुपये खर्चही देऊ केला होता. तेव्हापासूनच स्थानिक गरिबांना सातत्याने काम मिळावं या उद्दिष्टाने प्रत्येक वर्षाच्या यात्रेसाठी नवीन रथ निर्माण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे बोलले जाते. जगन्नाथ पुरी मंदिराच्या समोर उभा असलेलं अरुण स्तंभ ज्याला अनेक लोक गरुड स्तंभही म्हणतात.. तो स्तंभ मराठ्यांनीच स्थापन केलं आहे. त्याकाळी हे अरुण स्तंभ मंदिर लुटण्याच्या उद्दिष्टाने येणाऱ्या हल्लेखोरांना इशारा देण्यासाठी होते. या पलीकडे पाऊल ठेवल्यास गाठ मराठ्यांची आहे, असा त्याचा त्याकाळचा अर्थ होता. 

पुरीमध्ये कायम असलेली मोहन भोगची प्रथा ही मराठ्यांनी सुरू केल्याचे इतिहासात नोंद आहे. भोसले राजांनीच पुढील काळात पुरीला देशातील इतर भागांशी जोडणारे महत्त्वाचे रस्ते बांधले. पुरी शहराकडे येणारे अनेक पूल बांधले आणि त्यामुळेच पुरीची जगन्नाथ यात्रा देशभरातील भाविकांना आकर्षित करू लागली. भोसले राजांनीच जगन्नाथ पुरीसह ओडिशाच्या मोठ्या भागात प्रशासनिक व्यवस्था निर्माण केली. अनेक धर्मशाळा विहीर बांधल्या. शेतीची सुधारणा करत कर रचना निर्माण केली जमिनीचे रेकॉर्ड तयार केले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget