एक्स्प्लोर

Nagpur News : श्वानाने रस्त्यावर घाण केल्यास मालकावर कारवाई, सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करणाऱ्यांवर 84 हजारांचा दंड

Nagpur News : अनेक जण घरातील श्वानासह सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर फिरण्यास निघतात. श्वानांचा प्रातःविधी हाच सर्वांचा हेतू असतो. आता महापालिका या श्वान मालकांवर कारवाई करणार आहे.

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचास पाळीव श्वान घेऊन रस्त्यांवर येणाऱ्या श्वान मालकांवर दंड आकारण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. श्वान मालकांकडून पुढील महिन्यांपासून दंड आकारणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मंगळवारी एका दिवसातच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 85 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. अनेक जण घरातील श्वानासह सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर फिरण्यास निघतात. श्वानांचा प्रातःविधी हाच सर्वांचा हेतू असतो. यामुळे शहरात अस्वच्छता पसरत असून आरोग्याच्याही समस्या निर्माण होत आहेत. काही वर्षांपूर्वी महानगरपालिका श्वान मालकांवर दंड आकारत होती. नंतर दंड आकारणेच बंद करण्यात आले होते. आता पुन्हा महानगरपालिकेने श्वान मालकांवर (Pet Owners) दंड आकारण्यासाठी नव्या नियमांसह पावले उचलण्याचा निर्धात केला आहे. त्यामुळे श्वान मालकांकडून मोठी दंड वसुली होणार आहे.

कचरा टाकणाऱ्यांकडून 31 हजार 200 वसूल

दरम्यान, महानगरपालिकेने आजपासून सार्वजनिक ठिकाणांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी 84 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. यात लघवी करणारे, कचरा फेकणारे, थुंकणारे तसेच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांचा समावेश आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची 78 प्रकरणांची नोंद केली. यातून 31 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. सार्वधिक 33 प्रकरणे लक्ष्मीनगर झोन, 20 प्रकरणे गांधीबाग झोन, आणि 7 प्रकरणे मंगळवारी झोनमध्ये नोंदवण्यात आली. या सर्वांवर प्रत्येकी 400 रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात आला.

प्रत्येकी शंभर रुपयांपासून 400 पर्यंत दंड वसूल

रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 53 जणांकडून प्रत्येकी 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. दुकानदारांकडून रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर कचरा टाकण्याची 34 प्रकरणे नोंद करण्यात आली असून प्रत्येकी 400 रुपये दंड वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेसविरुद्ध आशीनगर झोनमध्ये एक प्रकरणाची नोंद करण्यात आली असून एक हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

जनावरे बांधणाऱ्यांवर कारवाई

जनावरे बांधण्याचेही मंगळवारी झोनमध्ये एक प्रकरण उघडकीस आले असून त्याच्याकडून एक हाजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच इतर 42 व्यक्तीकडून 8400 रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणाऱ्या संस्थांकडून 23 प्रकरणांमध्ये 23000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात विविध झोनच्या उपद्रव शोध पथक प्रमुखांनी जवानांसोबत केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: 'क्लिप व्हायरल' करुन फुटक जेवणे, दारुची सवय पडली महागात, 2 वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या फारिसला अखेर अटक

तो हनुमंताच्या दर्शनाला आला अन् गदाच घेऊन गेला

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam: 'नीट'मध्ये 680 गुणांचा दावा, प्रत्यक्षात 160 गुण; विद्यार्थिनीला हायकोर्टाचा 25 हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?
'नीट'मध्ये 680 गुणांचा दावा, प्रत्यक्षात 160 गुण; विद्यार्थिनीला हायकोर्टाचा 25 हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
Nagpur Hit and Run Accident: नागपुरात हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाला उडवलं; जागीच अंत, कारच्या बोनेटचाही चेंदामेंदा
नागपुरात हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाला उडवलं; जागीच अंत, कारच्या बोनेटचाही चेंदामेंदा
सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत, नागपूर आणि नाशिकमधील विद्यार्थी आंदोलनावर ठाम
सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत, नागपूर आणि नाशिकमधील विद्यार्थी आंदोलनावर ठाम

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
Rain Update : पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज, हवामान विभागानं काय सांगितलं?
पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Embed widget