एक्स्प्लोर

Nagpur : घोड्यानं लाथ मारली अन् होत्याचं नव्हतं झालं! मामाच्या वरातीत भाच्याचा दुर्देवी मृत्यू

मामाच्या लग्नात ओवाळणीचे पैसे उचलण्यासाठी घोड्यावरुन उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा घोड्याने लाथ मारल्याने नागपूर जिल्ह्यातील खापा येथे दुर्देवी मृत्यू झाला.

नागपूरः (Nagpur News)  मामाच्या लग्नात वरातीत नाचणाऱ्या भाच्याला घोड्याने लाथ मारल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर आनंदात असणारे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

काळ कधी कुणाला, केव्हा घेऊन जाईल याचा नेम नसतो अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. घरात लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. लग्न मंडपात वरात जात असताना सहा वर्षीय चिमुकल्या भाच्याला घोड्याने लाथ मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. हशमेल सलमान शेख असे मृतक बालकाचे नाव आहे.

मृतक हशमेल हा मुळचा शिवा-सावंगा येथील रहिवासी असून आईवडिलांसोबत मामाच्या लग्नाला खापा (Nagpur) येथे आला होता. नवरदेव घोड्यावर बसून होता. बॅन्डच्या तालावर घोडा व वऱ्हाडी मंडळी सुद्धा नाचत होती. दरम्यान वस्तीमधील एकाने ओवाळणी म्हणून दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली.

या ओवाळणीतील नोटा उचलण्यासाठी हशमेल हा घोड्यामागे गेला. त्याचवेळी घोड्याने लाथ मारल्याने तो जवळच असलेल्या दगडावर फेकल्या गेला. जखमी अवस्थेतील हशमेलला कुटुंबीयांनी खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे हशमेलवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यास सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. येथे तपासणीअंती हशमेलला मृत घोषीत केले. हशमेलच्या डोक्याला आतून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी दिली. चिमुकल्या हशमेलच्या मृत्यूची माहिती खापा येथे धडकताच आनंदाच्या घटीकेवर दुःखाची छाया पसरली. चिमुकल्याच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; संभाजीराजेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; संभाजीराजेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; संभाजीराजेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; संभाजीराजेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Ajit Pawar : जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
Embed widget