एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' अधिक; विधानभवनाबाहेरील कटआऊटमुळे रंगल्या चर्चा

कटआऊटमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांच्या कटआऊटचा आकार मोठा असल्याने मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांचीच 'उंची' अधिक असल्याची चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती.

Maharashtra Assembly Winter Session :  विविध प्रसंगांमुळे राज्य सरकारची सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हाती आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहेत?  यावर नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.   त्यातच बुधवारी नागपुरातील विधानभवनाबाहेर (Vidhan Bhavan Nagpur) लावण्यात आलेल्या कटआऊटमुळे पुन्हा त्याच चर्चांना उधाण आले आहे. या कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटचा आकार मोठा असल्याने मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांचीच 'उंची' अधिक असल्याची चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती.

राज्यातील सत्तांतरानंतर राज्यत अनेक प्रसंगामुळे राज्याचे स्टेअरिंग कोणाच्या हातात या आशयाचे मिसम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात येत होते. एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवलेला माईक बोलण्यासाठी घेतला होता. तर एकवेळा मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठी लिहून दिली होती. तर संयुक्त पत्रकार परिषदेतही अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री बोलताना दिसतात. त्यामुळे सत्ता आपल्या साहेबांचीच असल्याची मिम्स कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरील अनेक ग्रुपमध्ये शेअर करण्यात येतात. त्याप्रमाणे नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे लावलेले कटआऊट चर्चेचा विषय ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटमध्ये वरील बाजूने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची छायाचित्र आहे. तर खालील बाजूने 'आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वागत' असे लिहीलेले आहे. तर खालील बाजूने श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांची नावे आहेत. मात्र त्याच्याच शेजारी देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकाराचे कटआऊट लावण्यात आले आहे. या कटआऊटची उंचीही मुख्यमंत्र्यांच्या कटआऊटपेक्षा अधिक असून आकारही मोठा आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे कटआऊट लावणाऱ्यांचे नाव लिहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कटआऊट लावल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना डिचवण्यासाठीतर हे मोठे कटआऊट लावले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

प्रश्न विचारताच सहायक आयुक्त प्रकाश कराडेंकडून 'नो रिस्पॉन्स'

शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. मात्र नागपूर महानगरपालिकेजवळच हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कटआऊट लावण्यात आले आहे. या कटआऊटला आपल्याकडून परवानगी देण्यात आली आहे का? या संदर्भात धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश कराडे यांच्याची संपर्क साधला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआऊट खासगी जागेत असल्याचे त्यांनी सांगितले. होर्डिंग रोडवर असल्याचे सांगितले अन् त्यांना व्हॉट्सअपवर छायाचित्रे पाठविल्यावर त्यांनी फोनला प्रतिसाद देणे बंद केले. तसेच Sorry, I can't talk right now असा एसएमएस पाठवला. सामान्य नागरिकांचे होर्डिंग बॅनरवर कारवाईकरुन त्यांच्याकडून दंड वसूल करणाऱ्या मनपाने राजकीय पक्षांना सुट दिली आहे का ? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे.

किरण पांडव यांच्याकडूनही 'नो रिस्पॉन्स'

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या शुभेच्छांचे कटआऊट बाळासाहेबांची शिवसेनाचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी लावले आहे. मात्र त्याचा आकार उपमुख्यमंत्र्यांच्या कटाऊटपेक्षा लहान असल्याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी किरण पांडव यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच एसएमएसला प्रतिसाद दिला नाही.

खालील लिंकवर बघा बहुचर्चित कटआऊचे अधिक फोटो...

In Pics : विधानभवनाबाहेरील कटआऊटमुळे रंगल्या चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget