एक्स्प्लोर

Bharat Mukti Morcha Nagpur : परवानगी नाकारल्यावरही हजारो आंदोलक रस्त्यावर; इंदोरा परिसराला छावणीचे स्वरुप

परिसरात जमाव बंदीही लावण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनाही ताब्यात घेतले असल्याच माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

नागपूरः परवानगी नाकारल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या (Bharat Mukti Morcha) हजारो आंदोलकाना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच कसरत झाली. सतत वाढत असलेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पोलिसांना बोलवावा लागता. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या पोलिसांच्या (Nagpur Police) व्हॅनही कमी पडल्याने खासगी बसेसचा वापर पोलिसांकडून करण्यात आला. यावेळी परिसरात जमाव बंदीही लावण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनाही ताब्यात घेतले असल्याच माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) धोरण हे लोकशाही विरोधी असून संघाची भूमिका संविधान विरोधाची असल्याचे आरोप करत भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आज, 6 ऑक्टोबर रोजी महारैलीचे (Protest Rally) आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी या रॅलीची परवानगी नकारली होती. त्यानंतर संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. मात्र नागपुरात 5 ऑक्टोबर रोजी महत्त्वाचे दोन मोठे कार्यक्रम असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असतो. त्यामुळे 6 ऑक्टोबर ऐवजी पुढील एक दोन दिवसात रॅलीच्या परवानगीसाठी अर्ज करावा असा सल्ला उच्च न्यायालयाच्यावतीने देण्यात आला होता. तरी भारत मुक्ती मोर्चा आपल्या आजच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होता. त्यामुळे पोलिसही अॅक्शन मोडमध्ये होते. त्यांनी पाच ऑक्टोबरच्या रात्रीपासून तर गुरुवारपर्यंत सुमारे 150 लोकांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी खासगी बसेस

तसेच गुरुवारी सकाळपासून संघ मुख्यालय (RSS Headquarter) परिसर, बडकस चौक, तसेच बेझनबाग, इंदोरा चौक, कडबी चौक येथे पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच नागरिकांना एकत्र जमू न देताच आहे त्या ठिकाणी ताब्यात घेण्याची कारवाई सकाळपासून सुरु झाली. बेझनबाग ते बडकस चौक (Badkas Chowk) परिसरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच एकत्र जमणाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु होती. पोलिसांकडून एवढी खबरदारी घेण्यात आल्यावरही इंदोरा चौकात सकाळपासून हजारोंच्या संख्येत नागरिक जमण्यास सुरुवात झाली होती. बंदोबस्तात असलेले पोलिस कर्मचारीही (Police) अपूरे पडत असल्याने वेळेवर अतिरिक्त फौजफाटा पोलिसांना बोलवावा लागला. तसेच आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी असलेले पोलिसांचे वाहनही कमी पडत असल्याने खासगी ट्रॅव्हल बसेसवर (Private Buses) ऑन पोलिस ड्यूटीचा स्टीकर लावून आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत होते.

महिलांचाही आक्रोश

भारत मुक्ती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात महिला आंदोलकही आक्रमक दिसून आले. मात्र त्यांनाही महिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलनात 'या' संघटनांचा सहभाग

या आंदोलनात बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्क, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, भारतीय युवा बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मायनॉनिरीटी मोर्चा आदींचा सहभाग होता. हा मोर्चा बेझनबाग मैदानावरुन 11 वाजता निघणार होता.

पोलिसांवर अतिरिक्त ताण

बुधवारी शहरात सकाळी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे कार्यक्रम, तसेच दिवसभरापासून दीक्षाभूमी येथे जमलेल्या लाखोंच्या संख्येत आलेल्या अनुयायांची गर्दी, तसेच कस्तूरचंद पार्कवरील रावण दहन, त्यामुळे आधीत पोलिसांवर अतिरिक्त ताण होता. तसेच आज सकाळच्या आंदोलनामुळे पोलिसांही हैराण करुन सोडल्याचे अनेकांनी खासगीत बोलून दाखवले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करूनदिली होती धमकी

बुद्धाचे तत्वज्ञान विश्वकल्याणाचे, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ; लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थिती 66 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget