Nagpur News : विषारी इंजेक्शन घेऊन महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य
Nagpur News : महिला डॉक्टरने स्वतःच्या हाताने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Nagpur News : महिला डॉक्टरने स्वतःच्या हाताने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपराजधानी नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आकांक्षा अमृत मेश्राम असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. नैराश्यातून या महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. जरीपटका पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. 34 वर्षीय आकांक्षा अमृत मेश्राम हिने गुरुवारी रात्री विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्तीचे जीवन जगतात. आई एलआयसीत असून भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतोय.
उपराजधानी नागपूरमधील नागसेन परिसरात राहणाऱ्या डॉ आकांक्षा मेश्राम असे मृत महिलेच नाव आहे. आकांक्षा यांचं एमडी पर्यंतच शिक्षण झालं होतं, 2017 मध्ये आकांक्षा यांचं लग्न झाले. मात्र वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्याने 2019 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आकांक्षा सध्या सोलापूरमधील रुग्णालयात सरकारी नोकरीवर होत्या. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्या आईवडिलांकडे राहायला आल्या. घरी सगळं सुरळीत असताना आकांक्षा यांनी इंजेक्शनच्या माध्यमातून विष घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यांनी वयक्तिक जीवनातील नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा जरीपटका पोलीस पुढील तपास करत आहेत.
वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानंतर आकांक्षा एकाकी पडल्यासारख्या झाल्या होत्या. त्या नैराश्याने घेरल्यासारख्या वागत होत्या. 34 वर्षीय आकांक्षा अमृत मेश्राम यांनी विषारी इंजेक्शन घेण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, त्यात त्यांनी आपली व्यथा मांडतानाच आता कोणताच डॉक्टर माझा उपचार करू शकत नाही, असे लिहून ठेवल्याचे समजते. आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नका, असेही त्यांनी म्हटलेय.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live