एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

GMC Nagpur : नागपुरात तरुणाकडून महिला डॉक्टरला मारहाण : व्हिडीओ व्हायरल

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरला बाहेरच्या एका तरुणाने मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Government Medical College Nagpur : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील (मेडिकल) कॅन्टीनसमोर सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभागातील महिला डॉक्टरला बाहेरच्या एका तरुणाने मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओनुसार सुरुवातीला मेडिकलच्या (GMC) कॅन्टीनसमोर महिला डॉक्टर आणि मारहाण करणारा युवक दोघेही बोलत होते. बोलता-बोलता त्यांच्यात वाद झाला आणि अचानक तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण सुरु केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. डॉक्टरला कॅज्युल्टीत हलवले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनाही बोलवले. 

सुरक्षारक्षक बघ्याच्या भूमिकेत

मारहाण केल्यानंतर प्रियकर पसार झाला होता, मात्र पोलिसांनी काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. मात्र महिला डॉक्टरने पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मेडिकच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला कॅफे कॅन्टीन आहे. येथे ही डॉक्टर मैत्रिणींसोबत चहा पित होती. यानंतर हा तरुण येथे आला. तेव्हा ही घटना घडली. अवघ्या पंधरा फूट अंतरावर सुरक्षारक्षक तैनात होते, मात्र ते बघ्यांच्या भूमिकेत होते. काही वेळानंतर निवासी डॉक्टरांचा जत्था येथे पोहोचला. प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाने पोलिसांना बोलावले. 

मेडिकलमध्ये दोन दिवसांच्या स्वतःच्या बाळाला पित्याकडून फरशीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल, मंगळवारी (3 जानेवारी) येथील कॅन्टीनजवळ महिला डॉक्टरला तिच्या कथित प्रियकराने मारहाण केल्याचे प्रकरण घडले. 

लवकरच 140 सीसीटीव्ही लावणार

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात खटके उडण्याच्या, मारहाणीच्या घटना घडतात. डॉक्टरांना मारहाण होत असल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. महाराष्ट्र सुरक्षा दल, युनिटी सुरक्षा एजन्सी यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. सुरक्षा व्यवस्थेत कसूर केल्यास खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी दिला. लवकरच 140 सीसीटीव्ही कॅमेरे मेडिकलच्या आवारात लावण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

पूर्वी इंटर्नवर रोखली होती बंदूक

मेडिकलच्या वाचनालय परिसरात बीपीएमटीच्या इंटर्न विद्यार्थिनीवर तिच्या प्रियकराने बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुदैवाने गोळी सुटली नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेची दखल घेत मेडिकल प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलवले होते. पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. दोन दिवस मेडिकल परिसरात बंदूक शोधण्यासाठी घालवले होते. तसेच आठ दिवसांपूर्वी मेडिकलमधील प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांच्यातही सुपर स्पेशालिटीमध्ये 'तू.. तू मैं.. मैं' झाली होती.

ती वैयक्तिक बाब...

मेडिकलमध्ये असे अनेक नातेवाईक येतात. त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्यात मारहाण झाल्यास मेडिकल प्रशासन जबाबदार नाही. या घटनेतही कॅन्टीनसमोर महिला डॉक्टर आणि मारहाण करणारा युवक बोलत होते. अचानक युवकाने मारहाण करण्यास केली. त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न होता. प्रशासकीय जबाबदारी म्हणून पोलिसांना बोलावले, परंतु पोलिसात तक्रार दाखल करण्यास डॉक्टरने नकार दिला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले.

ही बातमी देखील वाचा...

वेकोलीच्या अधिकाऱ्याच्या घर-कार्यालयावर सीबीआयच्या धाडी; आतापर्यंत 67 लाखांची अतिरिक्त मालमत्ता उघड!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Mahayuti CM: राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
Embed widget