एक्स्प्लोर

Mahayuti : एकनाथ शिंदेंकडून विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, राजीनाम्याचा इशारा

BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रामटेक मतदारंसघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करत पक्षात प्रवेश दिला होता.

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळता भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (13 ऑक्टोबरला) एका जाहीर कार्यक्रमात रामटेक विधानसभेतून आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी घोषित केली आहे. आशिष जयस्वाल हे रामटेक मधून चार टर्मचे आमदार आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केल्यानं रामटेक विधानसभा शिवसेनेच्या कोट्यात गेल्याचे निश्चित मानलं जातंय. यामुळं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.  

आशिष जयस्वाल 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी मविआला पाठिंबा दिला होता.   एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी जयस्वाल यांनी शिंदे यांची साथ दिली होती. 

रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवणी मध्ये विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात आशिष जयस्वाल यांचा पक्षप्रवेश करत त्यांची उमेदवारी ही जाहीर केली होती.   2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष जयस्वाल अपक्ष लढले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.  युतीधर्म न पाळता भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

भाजपच्या मसनर कार्यालयात एक काल बैठक पार पडली आहे.त्यात रामटेकची जागा भाजपने लढवावी अशी भुमिका देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे देणार असाही सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा असल्याची माहिती आहे.  

मनसर येथे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मल्लिकार्जून रेड्डी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.  "2019 मध्ये युतीधर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वाल यांना उमेदवारी का”?असा संतप्त सवाल भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.  एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..Ambadas Danve On Assembly Election : भाजपला विचारुनच निवडणूक आयोग सगळं ठरवतं- दानवेSanjay Raut On Assembly Election : निवडणुका जाहीर, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज- संजय राऊतMaharashtra VidhanSabha Elections 2024:  निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं परफेक्ट नियोजन, मतदारांना महत्त्वाचं आवाहन
सर्व प्रक्रियेची व्हिडीओग्राफी ते चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी मतदारांची मदत, निवडणूक आयोगाचं परफेक्ट नियोजन
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर
उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election | EC PC : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
Maharashtra Assembly Election | EC PC : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
Embed widget