एक्स्प्लोर

Azadi Ka Amrit Mahotsav : नागरिक अन् पोलिसांमधील संवाद वाढविण्यासाठी माहितीचे प्रदर्शन आवश्यक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत घटना आपल्या सोबत होत नाही तोपर्यंत पोलिसांचे कार्य माहिती पडत नाही. पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी काम करतात त्याची उत्तम मांडणी या स्टॉलवर केली आहे.

नागपूर : पोलीस समाजाच्या रक्षणासाठी काय काय करते, याची माहिती मुलांच्या माध्यमातून समाजापर्यंत जात आहे. हे अतिशय सकारात्मक आहे. पोलीस आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी अशा माहितीचे प्रदर्शन उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नागपूर येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत पोलीस भवनामध्ये नागपूर पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या विविध कार्यासंदर्भातील प्रदर्शन आयोजित केले आहे. 

'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' वर्षांमध्ये पोलीस सामान्य माणसांसाठी काय काय करते, याची माहिती विद्यार्थ्यांपासून तर सामान्य माणसांपर्यंत व्हावीत. यासाठी या प्रदर्शनाचे 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली यावेळी त्यांनी पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीला हीरवी झेंडी दाखवली. तसेच नागपूर ग्रामीणच्या सायबर सेलचे उद्घाटनही केले. दुपारी पाच वाजता नव्या पोलीस भवनात आगमन झाल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. 

प्रत्येक स्टॉलवर माहिती

त्यानंतर त्यांनी या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये जलद प्रतिसाद पदक, बॉम्बशोधक व नाशक पथक, भरोसा सेल, दामिनी सेल, शॉन पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, अग्निशस्त्र प्रदर्शन, अश्रुधुर प्रदर्शन, पोलीस दीदी, पोलीस काका कार्य, गणवेश प्रदर्शन, वाहतूक पोलिसांचे कार्य, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, महाराष्ट्र पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य, आदी विविध स्टॉल आकर्षक पद्धतीने लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर कार्यपद्धती समजावून सांगण्यात येत होती. देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम आणि त्यासाठी  हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

स्टॉल भेटीनंतर विद्यार्थ्यांची संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी 'हर घर तिरंगा ' या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरावर तिरंगा उभारण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देशभक्तीपर जयघोष केला. तत्पूर्वी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस विभागाने अभिनव कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस अनेक प्रकारे काम करत असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनाक्रमाची त्यांचा संबंध असतोच. मात्र जोपर्यंत घटना आपल्या सोबत होत नाही तोपर्यंत पोलिसांचे कार्य माहिती पडत नाही. पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी काय काम करतात त्याची उत्तम मांडणी या स्टॉलवर केली आहे. नागपूरकर जनतेने 15 तारखेपर्यंत असणाऱ्या या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, नवीनचंद्र रेड्डी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन, पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, बसवेश्वर तेली, नरूल हुसेन, गजानन राजमाने, चेतन तिडके यांच्यासह पोलीस दलातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget