Dharmarao Atram : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचा मोठा निर्णय, गोंदियाचं पालकमंत्रिपद सोडणार, कारण सांगितलं...
Dharmarao Baba Atram : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
नागपूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. आत्राम यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला फोनवरुन दिली.
धर्मराव बाबा आत्राम काय म्हणाले?
धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, पक्षाचे नेते अजित पवार यांना त्या संदर्भातील माहिती दिली आहे. आता गोंदियाच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची वर्णी लागणार की भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे पालकमंंत्रिपद जाणार हे पाहावं लागलं.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्रि पद सोडणार असल्याचे धर्मराव बाबा आत्राम एबीपी माझाशी फोन वर बोलताना बोलले.
धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असं देखील सांगितलं. गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गानं करणं वारंवार शक्य होत नाही असेही आत्राम म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे विजयी झाले आहेत. या जागेवर जरी भाजपचा उमेदवार असला तरी भंडारा-गोंदिया ची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवरही होती. मात्र, तिथे महायुतीला यश मिळालं नाही.. त्यामुळे आत्राम यांनी अचानक गोंदिया चा पालकमंत्री पद सोडण्यामागे राजकीय कारणे ही आहेत का अशी शंका निर्माण होत आहे.
धर्मराव बाबा आत्राम यांची अजित पवारांना साथ
महाविकास आघाडीच्या काळात धर्मराव बाबा आत्राम हे मंत्री होते. याशिवाय अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनले.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीतील धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी मतदारसंघात देखील भाजपचा उमेदवार पिछाडीवर राहिला होता. काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांना अहेरी विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली.
संबंधित बातम्या :