Dhammachakra Pravartan Din 2022 : आज साजरा केला जातोय 66 वा "धम्मचक्र प्रवर्तन दिन"; काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर
Dhammachakra Pravartan Din 2022 : अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला.
Dhammachakra Pravartan Din 2022 : "धम्मचक्र प्रवर्तन दिन" (Dhammachakra Pravartan Din 2022) हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा करतात. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. या उत्सवाची पार्श्वभूमी म्हणजे हा एक धर्मांतरण सोहळा आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 5 ऑक्टोबर (आज) नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे.
काय आहे इतिहास?
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवfले आणि 14 ऑक्टोबर इ.स. 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या 5,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ही धम्मभूमी दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.
नागपुरात भाविकांची मोठी गर्दी :
या दिवसाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदाचा 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज (5 ऑक्टोबर) या ठिकाणी साजरा केला जातोय. तसेच देश विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक आणि अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा या उत्सवात सहभागी होतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात. यामध्ये कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धर्मात प्रवेश करतात.
महत्वाच्या बातम्या :