एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Janta Curfew | मुंढे साहेब, हे काय चाललंय!, नागपुरात मेसेज करुन जवळपास 500 कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले?
नागपूरमध्ये जवळपास 500 कर्मचारी एकत्र बोलावले असल्याची माहिती आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते डॉक्टर्स, नर्सेस आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलावलं असल्याची माहिती आहे
नागपूर : नागपूरच्या महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन ऑफिसमध्ये जवळपास 500 कर्मचारी एकत्र बोलावले असल्याची माहिती आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते डॉक्टर्स, नर्सेस आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलावलं असल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून आता होम व्हिजिट टेस्टसाठी टिम्स पाठवणे सुरू आहे. हे सर्व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरुन सुरु असल्याचा मेसेज व्हाट्सअॅपवरुन फिरत आहे. या आदेशानंतर अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचारी या ठिकाणी जमले असल्याची माहिती आहे. कोरोनोसंदर्भात उपाययोजनांसाठी नागपुरातून आधीच टीम्स जात होत्या. मात्र आजच्या दिवशी राज्यासह देशात कर्फ्यु असताना अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावणं चुकीचं असल्याचा सूर उमटत आहे. या ठिकाणी आलेले डॉक्टर्स अनइझी आहेत, अशी देखील माहिती आहे.
असा आहे तो मेसेज
Dear all(MO,gnm,anm,Labtechnician,pharmacist,attendent,all class 4 staff,paramedical staff and all health department staff of Nmc and NUHM)corona quarantine patients Home visit training at Laxmi nagar zone office near water tank at 8:30 am and after training our actual work starts by order of hon.add comissioner sir and hon commissioner sir .
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल सकाळी शहरात फेरफटका मारून लॉकडाऊनची पाहणी केली होती. बर्डी परिसर, कॉटन मार्केट, गांधी सागर, गांधी गेट, महाल, बडकस चौक, सीए रोड, गोळीबार चौक, टिमकी आणि मोमीनपुरा भागात मुंढे यांनी पाहणी केली होती. अनेक ठिकाणी मुंढे यांनी उघड्या असलेल्या दुकानांना पोलिसांच्या मदतीने बंद केले होते. काही ठिकाणी लोकं नाहकच मोठ्या संख्येने घराबाहेर येऊन गोळा झालेले होते. त्या ठिकाणी ही मुंढे यांनीच लोकांना घरात जाण्याचा सल्ला द्यावा लागला होता. अत्यावश्यक सेवा सोडून ही अनेक दुकानदारांनी त्यांचे दुकाने सुरु ठेवल्यामुळे मुंढे यांचा पारा चांगलाच चढला होता. मात्र आज त्यांच्याच आदेशाने अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना असं एकत्रित बोलावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित या रुग्णाला 21 मार्चला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशभरातील मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 10 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यातील चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 15
- मुंबई - 25
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
निवडणूक
Advertisement