स्वराज्य महोत्सव : उद्या सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन, जिथे असाल तिथे उभे राहून व्हा सहभागी
बुधवारी सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खाजगी आस्थापना, केंद्र शासनाचे कार्ययालय अशा सर्व संस्थानी या समूह राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव अंतर्गत उद्या सकाळी 11 वाजता सामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी जे जिथे उभे असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक शासकीय व निमशासकीय, खाजगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी समूह राष्ट्रगीत गायनाचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत उद्या 17 ऑगस्ट रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समोर राष्ट्रगीत गायनाबाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालय,शाळा, महाविद्यालय, निम:शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, केंद्र शासनाची सर्व कार्यालय, आस्थापना, जिल्ह्यातील नोंदीत असणारी व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, दुकाने, बाजार, मॉल, जिल्ह्यातील सेवा पुरवठादार, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, धर्मदाय आयुक्त यांच्याकडील नोंदीत असणाऱ्या सर्व संस्थानी उद्याच्या या समूह राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन समूह समूह राष्ट्रगीत गाणार आहेत. जिल्हा परिषदेतही सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित समूह राष्ट्रगीत गाणार आहेत. सामान्य नागरिकांनी ते ज्या ठिकाणी उपस्थित असतील त्या ठिकाणी आपल्या घरात किंवा बाहेर वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे निशुल्क सांस्कृतिक कार्यक्रम
मनपामध्येही आयोजन; सहभागी होण्याचे अवाहन
नागपूर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आयोजित 'स्वराज्य महोत्सव' अंतर्गत बुधवारी, 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता नागपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर सर्व महत्वाच्या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन होईल. सामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी जे जिथे उभे असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. नागपूर महानगपालिका मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन होईल. नागरिकांनी, खाजगी व्यवस्थापन सुद्धा सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात सामील होतील. नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण न होता सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.