एक्स्प्लोर

Sana Khan Case: मोठी बातमी! सना खान प्रकरणाला नवं वळण? आरोपीच्या घरातून मोबाईन अन् लॅपटॉप जप्त

Sana Khan Murder Case: सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.

Sana Khan Murder Case : नागपूर : राज्यासह (Maharashtra News) संपूर्ण देश हादरवणाऱ्या नागपुरातील (Nagpur Crime News) सना खान हत्या प्रकरणी (Sana Khan Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपच्या (BJP) अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी एक मोबाईल फोन (Mobile) आणि एक लॅपटॉप (Laptop) जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. जबलपूरमधून (Jabalpur) जप्त झालेले ते मोबाईल सना खान यांचेच असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या विशेष पथकानं जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणी काही नव्या घडामोडी घडू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सना खान हत्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची 'पोलिग्राफ टेस्ट' आणि 'लाय डिटेक्टर टेस्ट' करण्याचं ठरवलं असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. भाजप पदाधिकारी सना खान काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरला जाऊन बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर अमित साहू नावाच्या त्यांच्या मित्रानंच त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र आजवर सना खान यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सना खान यांचे मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेले नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांत नागपूर पोलिसांनी याप्रकरणी नव्या दमानं तपास सुरू केल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

सना खान हत्या प्रकरण नेमकं काय?

सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.  मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं.  पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत. त्यानंतर अमित साहूने हत्या केल्याची कबुली दिली होती. परंतु त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nagpur :  देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबागRaju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थितABP Majha Headlines :  8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Embed widget