एक्स्प्लोर

Nagpur Crime News : बनावट नोटा देत लाखोंचे दागिने पळविले; संशयितांना दिल्लीतून अटक

Nagpur Crime News: पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा दाखवून महिलेचे लाखों रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला नागपूर गुन्हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने दिल्ली येथून अटक केली आहे.

Nagpur News नागपूर : पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा दाखवून महिलेचे लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला नागपूर गुन्हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने (Nagpur Police) अटक केली आहे. भावनिक साद घालत या संशयित आरोपींनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पळ काढला होता. विशेष बाब म्हणजे ही घटना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरातील (Nagpur Crime News) घराजवळ घडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयितांचा मागोवा घेत त्यांना दिल्ली येथून अटक केली. 

बनावट नोटांचे बंडल ठेवत लाखोंचे दागिने लंपास 

संजय रामलाल सोलंकी (27, रा. कराला, शिवविहार, उत्तर पश्चिम दिल्ली) आणि गोविंद उकाराम राठोड (49, रा. रघुवीरनगर, उत्तर दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गिरीपेठ येथील रहिवासी असलेल्या दमयंती समशेर बहादुर सिंग (69) या 18 जानेवारीला सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान कुकर दुरुस्तीसाठी घराबाहेर पडल्या. वाटेत त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले. त्यांनी वयोवृद्ध दमयंती यांना विश्वासात घेतले. आम्हाला गरीब मुलांची मदत करायची आहे, असे सांगून त्यांना जवळचं असलेल्या भोजनालयाकडे घेऊन गेले.

त्यानंतर या दोघांपैकी एकाने दमयंती यांच्याकडे असलेल्या पिशवीत पाच लाख रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले आणि दमयंती यांना अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून दमयंती यांनी सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे लॉकेट असा एकूण 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढला. आरोपींनी पिशवीत दागिने ठेवत असल्याचे भासवून दागिने घेऊन फरार झाले. आरोपी गेल्यानंतर दमयंती यांनी पॉलिथीनमधील पैशांचे बंडल तपासले असता, वरच्या बाजूला 500 रुपयांची नोट तर खालील भागात कोरे कागद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हा सर्व प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच या परिसरात त्या दोघांचा शोध घेतला, मात्र तोपर्यंत ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दमयंती यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत आपबिती सांगितली. त्यानंतर दमयंती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

सापळा रचून आरोपींना दिल्लीतून अटक

त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरामधील फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीताबर्डी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे तांत्रिक तपास करून आणि सायबर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे लोकेशन मिळविले. त्यानंतर या लोकेशनवर सापळा रचून आरोपींना दिल्ली येथून अटक केली. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून दोन सोन्याच्या बांगड्या, लॉकेट, दोन मोबाइल आणि रोख 49 हजार असा एकूण 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nagpur Crime News : खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याने मित्रालाच संपवले

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget