सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार, सावनेर विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू
सावनेर विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत.
नागपूर : सुनील केदार (Sunil Kedar) यांना बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणी तुरुंगवास झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता सुरु झाली आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता बळावली आहे. राजकीय वर्तुळात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनीक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पुढील आठवड्यात यासंदर्भात काही हालचाली होऊ शकतात...
नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी 22 जानेवारीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सुनील केदार यांचे नियमानुसार त्यांची विधानसभेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सावनेर विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. उमेदवारीवरून दावे- प्रतिदावे सुरु झाले आहेत.
पुढील आठवड्यात यासंदर्भात हालचाली वाढण्याची शक्यता
केदार हे बँक घोटाळ्यात दोषी सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे पैसे या घोटाळ्यात जाणूनबुजून बुडवल्याचे न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटल्यामुळे ग्रामीण भागात केदार विरोधात वातावरण तयार करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून सध्या अनुकूल स्थिती आहे असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.याच अनुषंगाने सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता बळावली आहे.. प्रशासनिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पुढील आठवड्यात यासंदर्भात काही हालचाली होऊ शकतात.
पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह
दरम्यान यापूर्वी पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची जागा खासदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्यानंतरही जवळपास एवढाच कालावधी शिल्लक असताना पोटनिवडणूक घेण्यात आली नव्हती त्यामुळे सावनेर मधील पोटनिवडणूक घेतली जाईल का हा ही प्रश्न कायम आहे.
2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
सावनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेले सुनील केदार यांना शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल केल्या गेले. दरम्यान, नागपुरातील मेडिकलच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा :