एक्स्प्लोर

नागपुरात माजी मंत्र्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करुन परतलेली रुग्णवाहिका विधानभवनासमोर चेंबरमध्ये अडकली, अन्...

ही रुग्णवाहिका माजी मंत्र्यांना खासगी रुग्णालयात सोडून आली होती. मात्र त्यांना सोडण्यासाठी जाताना ही घटना घडली असती तर काय? घटनेची जबाबदारी कोणी स्विकारली असती असा प्रश्न उपस्थित होतो.

Maharashtra Assembly Winter Session : राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडण्यात येतात. मात्र विधानभवन  (Vidhan Bhavan Nagpur)परिसरातच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे माजी मंत्री यांना रुग्णालयात सोडून आल्यानंतर रुग्णवाहिकेचे चाक विधानभवन परिसरातील चेंबरमध्ये फसले. ही रुग्णवाहिका माजी मंत्र्यांना खासगी रुग्णालयात सोडून आली होती. मात्र त्यांना सोडण्यासाठी जाताना ही घटना घडली असती तर काय घडणाऱ्या घटनेची जबाबदारी कोणी स्विकारली असती असा प्रश्न उपस्थित होतो.

नागपूरात कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होत आहे. राज्यभरातून येणारे मंत्री- आमदार आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आमदाराच्या जीवावर बेतले असते. महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्यांना विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्याचे सूचवले. त्यानंतर त्यांना नागपुरातील विवेका हॉस्पिटलमध्ये (Hospital) भरती करण्यात आले. सध्या पाचपुते यांच्यावर सुभाषनगर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना खासगी रुग्णालयात सोडून आल्यानंतर विधानभवन परिसरात रुग्णवाहिकेचे चाक विधानभवनासमोरच असलेल्या चेंबरमध्ये फसले.

कालच करण्यात आली होती चेंबरची दुरुस्ती


नागपुरात माजी मंत्र्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करुन परतलेली रुग्णवाहिका विधानभवनासमोर चेंबरमध्ये अडकली, अन्...

विधानभवन समोर असलेल्या चेंबरचे झाकण अधिवेशनाच्या (Winter Assembly Session) पहिल्या दिवसापासूनच तुटलेले होते. त्यानंतर बुधवारी अधिवेशनाचे सत्र संपल्यानंतर सायंकाळी चेंबरवर फ्रेम आणि त्याचे झाकण अलगत ठेवण्यात आले होते. यासंदर्भात एबीपी माझाने बुधवारी विचारणा केल्यावरही कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. मात्र आज दुपारी याच चेंबरवर रुग्णवाहिकेचे चाक फसले. याशिवाय परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.

कृत्य लपविण्यासाठी  'गार्डन'



नागपुरात माजी मंत्र्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करुन परतलेली रुग्णवाहिका विधानभवनासमोर चेंबरमध्ये अडकली, अन्...

चेंबरवर अलगद ठेवण्यात आलेल्या झाकणामुळे रुग्णवाहिकेचे चाक फसले होते. परिसरातील नागरिकांना धक्का मारुन या रुग्णवाहिकेला बाहेर काढले. मात्र ही घटना सर्व माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांनी लगेच त्या चेंबरवर सिमेंटचं दुसरं मोठं झाकण ठेवून त्याच्या चारही बाजूने फुलांची रोप ठेवून त्याची बागच तयार केली. चूक लपविण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या चमकोगिरीची चर्चा विधानभवन परिसरात होती.

ही बातमी देखील वाचा

एयू-एयू कौन है, घोषणांनी दणाणला विधानसभा परिसर; विरोधकांनी वाटले भूखंडाचे श्रीखंड...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget