एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रशियन तंत्रज्ञानाच्या एअरबोटची नागपुरात निर्मिती
रशियन सरकारच्या मदतीने भारतात आणलेल्या टेक्नॉलाजीनुसार एअरबोटची नागपुरात निर्मिती होणार आहे
नागपूर : रशियातील एअरबोट आता भारतात पाहायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरवासियांना अत्याधुनिक दिवाळी भेट आणली आहे. नागपुरातल्या कोराडीत एअरबोटची निर्मिती होणार आहे.
रशियन सरकारच्या मदतीने ही टेक्नॉलाजी भारतात येणार आहे. सध्या रशियात वास्तव्यास असलेले लाल बहादूर शास्त्री यांचे पणतू सुकृत शरण या प्रकल्पाचे प्रमुख असणार आहेत. या अत्याधुनिक एअरबोटची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
कशी असेल एअरबोट?
1. रशियन सरकारच्या मदतीने जगातील एकमेव हायब्रीड एअरोबोट टेक्निक
2. बोटसाठी कारचे इंजिन, विमानाचे पंखे असणार, मात्र चालणार पाण्यावर
3. पाणी, बर्फ, वाळू अशा कोणत्याही ठिकाणी चालण्यास सक्षम
4. साधारण स्पीड बोट 20 किमी प्रतितास वेगाने जाते, तर एअर बोट ताशी 80 किमी वेगाने धावेल
5. नागपुरातल्या कोराडीत पाच एकर जागेत निर्मिती होणार
6. इंधनासाठी इथेनॉलचा वापर केल्याने टॅक्सीपेक्षाही कमी दरात प्रवास शक्य होईल.
भारतात जलवाहतुकीकडे प्रचंड दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे नद्यांचा वापर प्रवासासाठी करायचा असेल, तर असं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement