एक्स्प्लोर

डिजिटल करन्सीच्या नावावर दोन हजार जणांना गंडा, दोघांची हत्या, फरार मोस्ट वॉन्टेडला ठोकल्या बेड्या

Nagpur News Update : दोन हजार लोकांना गंडा घालणाऱ्या मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे.

Nagpur News Update : फरार असलेल्ल्या मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. पोलिसांनी निशीदकडून चार लक्झरी गाड्या, एक पिस्तूल, काही जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कमेसह 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अटक केलेल्या निशीद वासनिक याने अवघ्या एका वर्षात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त जणांना डिजिटल करन्सीच्या नावावर 40 कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. निशीद वासनिक आणि त्याचा सहकारी महादेव पवार याच्यासोबत मिळून "इथर ट्रेड एशिया" नावाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या (वेबसाईट) माध्यमातून ही फसवणूक केली आहे. इथर म्हणजेच डिजिटल करन्सीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत रक्कम चौकट करता येते असे आमिष दाखवून त्याने गुंतवणूकदारांकडून तब्बल 40 कोटी रुपये गोळा केले होते. मात्र, गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर तो एप्रिल 2021 पासून फरार झाला होता.

नागपूर पोलिसांनी निशिद आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता. फरार असतानाच निशिद याचा सहकारी महादेव पवारसोबत वाद झाला. त्यामुळे संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे या दोन आरोपींच्या मदतीने माधव पवारचे नागपुरातून अपहरण करत त्याची वाशीम जिल्ह्यातील मालेगाव जवळ गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येच्या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी शोध मोहीम वाढवली होती. मात्र, अनेक ठिकाणी छापे घालूनही निशीद वासनिक पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याने काही आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील पंचमढी येथे गुंतवणूकदारांसाठी एक सेमिनार आयोजित करून पुन्हा फसवणुकीचे उद्योग सुरू केल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आपल्या हेरांचे जाळे त्याच्या अवतीभवती विणले.

गुप्त माहितीवरून निशिद हा पुण्यातील काही गुन्हेगारांच्या संरक्षणात लोणावळा या ठिकाणी एका डुप्लेक्समध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी पहाटे दोन वाजता नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने लोणावळा येथील त्याच्या डुप्लेक्सवर छापा घातला आणि निशिद वासनिक, त्याची पत्नी प्रगती वासनिक, हत्या प्रकरणातील आरोपी संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे यांच्यासह एकूण अकरा जणांना अटक केली. 

धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी नागपुरात आलेल्या निशिदने लवकर श्रीमंत बनण्याच्या नादात नागपुरातील काही गुन्हेगारांसोबत ओळखी वाढवल्या होत्या. त्यानंतर तो कोळसा तस्करांसोबत कार्यरत झाला होता. कोळसा तस्करीच्या व्यवसायात वाद होऊन त्याने नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरात एका उपसरपंचाचीही हत्या केली होती. त्यामुळे अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण गुन्हेगारी जगताच्या नादी लागून दोन हत्या आणि दोन हजार पेक्षा जास्त लोकांच्या फसवणुकीचा आरोपी बनला आहे. विशेष बाब म्हणजे निशिद याचे राज्यातील काही मोठ्या राजकारण्यांसोबत ओळखी असून आजवर फरार राहण्यामध्ये त्याला काही राजकारणी मदत करत होते का? हे पोलिसांना तपासावे लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget